फोटो सौजन्य - सोशल मिडिया
RCB’s new home : आयपीएल २०२६ सुरू व्हायला काही दिवस आहेत त्याआधी सध्या महिला प्रिमियर लीगचे सामने सुरू आहेत. त्याचबरोबर त्यानंतर टी20 विश्वचषक 2026 सुरू होणार आहे त्यामुळे सर्व क्रिकेट खेळाडू हे क्रिकेटचे आंतरराष्ट्रिय सामने खेळण्यात व्यस्त आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मागील वर्षी आयपीएल 2025 चे टायटल नावावर केले पण त्यानंतर संघ सातत्याने अडचणीत पाहायला मिळाला आहे. आयपीएल २०२६ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकते.
या मोठ्या स्पर्धेसाठी चाहते आधीच उत्सुक आहेत. सर्वांच्या नजरा गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आहेत. वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर त्यांनी इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद जिंकले. सर्वांना आशा आहे की पुढील हंगामातही ते धमाकेदार कामगिरी करताना दिसतील. याआधी, आरसीबी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. त्यांचे घरचे सामने बेंगळुरूमध्ये नव्हे तर दुसऱ्या शहरात होतील.
आयपीएल २०२६ पूर्वी, आरसीबीच्या घरच्या सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या चाहत्यांना आश्वासन दिले होते की आरसीबीचे सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पूर्ण सुरक्षेसह आयोजित केले जातील. तथापि, आरसीबी बेंगळुरूमध्ये त्यांचे सामने आयोजित करण्याच्या मनःस्थितीत नाही. टीओआयने वृत्त दिले आहे की आयपीएल २०२६ साठी नवी मुंबई आणि रायपूर आरसीबीचे नवीन घर बनू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचे पाच होम मॅच नवी मुंबईत आणि दोन रायपूरमध्ये खेळेल. डीवाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम (रायपूर) येथील अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर आरसीबीच्या अधिकाऱ्यांनी करार अंतिम केला आहे. परिणामी, बेंगळुरूऐवजी नवी मुंबई आणि रायपूर हे आरसीबीचे नवीन होम ग्राउंड असतील.
🚨 NEW HOME GROUND OF RCB IN IPL 2026. 🚨 – RCB likely to play their home matches at the DY Patil Stadium and in Raipur. RCB to play 5 matches in Navi Mumbai and 2 in Raipur. (Gaurav Gupta/TOI). pic.twitter.com/sVHpaDpB2X — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 13, 2026
केवळ आरसीबीच नाही तर राजस्थान रॉयल्सचे सामनेही हलवले जातील. आयपीएल २०२६ साठी सवाई मानसिंग स्टेडियम हे आरआरचे होम ग्राउंड राहणार नाही. काही काळापूर्वी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आरसीबी आणि आरआरला त्यांचे आयपीएल २०२६ चे सामने पुण्यात खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. राजस्थान रॉयल्सचे सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे. जयपूरच्या चाहत्यांसाठीही ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे.






