T- 20 वर्ल्डकप : सध्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची क्रेझ सुरु आहे. काही दिवसांनी म्हणजेच जून २०२४ मध्ये टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. यंदा टी20 वर्ल्डकपचे यजमानपद अमेरिका आणि कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) यांच्याकडे आहे. टी20 वर्ल्डकप हा २ जून ते २९ जून या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. आगामी महिना म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या संघातील खेळाडूंची यादी क्रिकेट चाहत्यांसमोर येणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच भारताच्या झालेल्या ODI वर्ल्ड कप २०२३ च्या या स्पर्धेमध्ये भारताचा संघाचा अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव करून वर्ल्ड कप भारताकडून हिसकावला. आता भारताच्या संघाकडे टी20 वर्ल्डकप मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सर्वच सहभागी संघ या टी20 वर्ल्डकपसाठी संघबांधणीचा विचार सध्या करत आहेत. भारतीय संघातही कोणाला संधी मिळणार, कोणाला नाही याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये छाप पाडून टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील निवडीसाठी दावेदारीही ठोकण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच आता फिरकी गोलंदाजांच्या जागेसाठीही मोठी स्पर्धा आहे. कोणत्या फिरकी गोलंदाजांचा टी20 वर्ल्डकपमध्ये नंबर लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. खाली दिलेल्या यादीमधील या फिरकी गोलंदाजांचा नंबर लागू शकतो.
युजवेंद्र चहल
आयपीएल २०२४ मध्ये दमदार कामगिरी करणारा युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. फिरकीपटूंमध्ये सध्या सर्वात्तम कामगिरी युजवेंद्र चहल करत आहे. तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप तीन गोलंदाजांमध्येही आहे. त्याने ७ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याचा विचार भारतीय निवड समीती करणार की नाही, हा प्रश्न आहे.
रविंद्र जडेजा
भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा देखील एक पर्याय आहे. परंतु, जडेजाला भारताकडून गेल्या काही महिन्यात टी२० क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळालेली नाही. तो यावर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही संधी मिळाली नव्हती.
कुलदीप यादव
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची भारतीय संघातील जागा जवळपास पक्की आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे, तसेच त्याची चायनामन गोलंदाजी त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. कुलदीपने 2024 आयपीएलमध्ये ४ सामने खेळले असून ६ विकेट्स घेतल्या आहेत.
रवी बिश्नोई
23 वर्षीय फिरकीपटू रवी बिश्नोई गेल्या काही महिन्यांत केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याची गुगली अनेक फलंदाजांना संभ्रमात टाकते. याशिवाय तो गेल्या काही महिन्यात भारतीय टी२० संघात नियमित खेळतानाही दिसला आहे.