फोटो सौजन्य – X (BCCI)
इंग्लंड दौऱ्यावरील झालेला पाचवा मालिकेचा सामना हा रोमांचक राहिला. टीम इंडियाने 35 धावा डिपेंड करून सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी केली आहे. भारताच्या संघाने मालिकेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला सहा धावांनी पराभूत करून मालिका ड्रॉ केली. भारताचे युवा खेळाडू या संघामध्ये सामील झाले होते. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे हेडफोन म्हणून गौतम गंभीर यांना निवृत्त करण्यात आले होते. भारताच्या संघाने गौतम गंभीर यांच्या कोचिंग मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये देखील पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे गौतम गंभीरावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात होते. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आता संपला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लंडसोबत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली, जी २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील शेवटचा सामना ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा सामना ६ धावांनी जिंकला आणि मालिका २-२ अशी संपली. कर्णधार म्हणून शुभमन गिलची ही पहिलीच कसोटी मालिका होती.
गिलची या मालिकेतील कर्णधारपद आणि फलंदाजीची कामगिरी अद्भुत होती. त्याचबरोबर चाहत्यांच्या मनात निर्माण होणारा मोठा प्रश्न म्हणजे टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका कधी आणि कोणत्या संघासोबत होणार? चला तुम्हाला याबद्दल माहिती देऊया. इंग्लंडनंतर, टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका आता वेस्ट इंडिजसोबत असेल. वेस्ट इंडिजचा संघ ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल. या दरम्यान, दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.
शुभमन गिल पुन्हा एकदा या मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसेल. त्याच वेळी, इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची या मालिकेसाठी निवड होऊ शकते. मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा आणि शेवटचा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीत खेळला जाईल. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासोबत घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये संघाला ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता.
शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केली. गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. गिलने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण ७५४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ शतके आणि एक द्विशतकही झळकावले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गिलची मालिकावीर म्हणूनही निवड झाली.