फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाचवा कसोटी सामना पार पडला आणि मालिका ड्राॅ झाली. भारताच्या गोलंदाजांनी कालच्या पाचव्या सामन्याच्या पहिल्या सेशनमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करुन इंग्लडच्या संघाला धुळ चारली. भारताच्या संघाला पाचव्या दिनी सामना जिंकण्यासाठी चार विकेट्सची गरज होती. तर इंग्लडला मालिका जिंकण्यासाठी 35 धावांची गरज होती. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या बाॅलपासुन जोर लावला आणि सामना जिंकला. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या कायमचा आठवणीमध्ये राहणारा आहे.
4 जुलै रोजी केनिंग्टन ओव्हल लंडन येथे झालेल्या मनोरंजक सामन्यामध्ये भारताच्या संघाने इंग्लिश संघाचा 6 धावांनी पराभव करुन मालिकेमध्ये बरोबरी केली. या विजयासह भारताच्या संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा निकाल 2-2 असा आला आहे. मालिकेत शानदार कामगिरी करूनही भारतीय संघ पिछाडीवर होता. अशा परिस्थितीत ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाचा सेलिब्रेशन पाहण्यासारखा होता. आता बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूप भावनिक दिसत आहेत.
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर, टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडिया २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचू शकली नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर, आता तरुण खेळाडूंसह टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका अनिर्णित केली आहे.
𝗕𝗲𝗹𝗶𝗲𝗳. 𝗔𝗻𝘁𝗶𝗰𝗶𝗽𝗮𝘁𝗶𝗼𝗻. 𝗝𝘂𝗯𝗶𝗹𝗮𝘁𝗶𝗼𝗻!
Raw Emotions straight after #TeamIndia‘s special win at the Kennington Oval 🔝#ENGvIND pic.twitter.com/vhrfv8ditL
— BCCI (@BCCI) August 4, 2025
मोहम्मद सिराजने गस अॅटकिन्सनची विकेट घेताच, गंभीर खूप भावनिक दिसत होता. त्याने प्रथम आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला, नंतर त्याने मॉर्न मॉर्केलला मिठी मारली. या मालिकेत टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली आहे, त्यावरून असे दिसते की शुभमन गिलचा संघ भविष्यात आणखी अनेक आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनशिवाय खेळणाऱ्या टीम इंडियाने बदलाच्या काळातही कमकुवत नसल्याचे दाखवून दिले आहे.
डेल स्टेनची भविष्यवाणी ठरली खरी! सिराजच्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर आता घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांना पराभूत करू इच्छितात. जेणेकरून तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये आणखी चांगली कामगिरी करू शकेल.