
Chess Competition
स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी एकूण ६० हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, ३५ वर्षांवरील तसेच मुलींसाठी विशेष अशा पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बुद्धिबळाच्या पटावर R Praggnanandhaa चा डंका! Grand Chess Tour जिंकणारा पहिला भारतीय
११ वर्षांखालील खुल्या गटात आयुष जगतापने प्रथम, तीर्थ कोद्रा याने द्वितीय, तर विश्वजा देशमुखने तृतीय क्रमांक मिळविला. १३ वर्षांखालील गटात एएफएम कविश लिमये प्रथम, विभव गुप्ता द्वितीय आणि विहान शाह तृतीय ठरले. १५ वर्षांखालील गटात चंद्रमौली जयकृष्णनने विजेतेपद पटकावले. डब्ल्यूसीएम अन्वी हिंगे द्वितीय तर प्रथमेश सुतार तृतीय आला.
खुल्या गटात गौरव बाकलीवाल प्रथम
३५ वर्षांवरील खुल्या गटात एफएम गौरव बाकलीवालने प्रथम क्रमांक मिळविला. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी द्वितीय आणि राहुल वर्मा तृतीय ठरले. मुली व महिलांच्या विशेष गटात ११ वर्षांखाली शाल्वी चस्कर, १३ वर्षांखाली अन्वी शेळके, १५ वर्षांखाली समायरा राय आणि ३५ वर्षांवरील गटात आशा ठोंबरे यांनी विजेतेपद मिळविले.
Chess: R. Praggnanandhaa ग्रँड चेस टूर फायनलमध्ये पोहचणार? विजेत्याला मिळणार तब्बल 1.91 कोटी रुपये
स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये राजस्थान राज्याचे माजी बुद्धिबळ विजेते तसेच जेईई १९९४ मध्ये अखिल भारतीय २२८२ वा क्रमांक मिळविलेले गौरव बाकलीवाल यांचा समावेश होता. बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक व संचालक वैभव बाकलीवाल यांनी विजेत्यांचा गौरव केला. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांसोबत कोडी व बुद्धिबळाशी संबंधित प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून संवाद साधला. दोन्ही बाकलीवाल बंधू फिडे मानांकित बुद्धिबळपटू असून, बुद्धिबळामुळे विकसित होणारी एकाग्रता, संयम, दूरदृष्टी आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतही उपयुक्त ठरते, असा आयोजकांचा विश्वास आहे.