
फुटबॉल सामन्यात रेफ्रीने दाखवले 53 रेड कार्ड
फुटबॉलमध्ये मैदणात कोणी गैरवर्तन केले अथवा चुकीचे कृत्य केले तर रेफ्री त्याला रेड कार्ड दाखवतात. मात्र आता समोर आलेल्या घटनेत रेफ्रीने तब्बल 53 वेळा रेड कार्ड दाखवले आहे. रेड कार्ड दाखवण्याचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. काच सामन्यात सर्वाधिक रेड कार्ड दाखवण्याचा जुना जागतिक विक्रमच मोडीत निघाला आहे. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
ब्राझीलमध्ये सध्या अंडर-20 चॅम्पियनशिपच्या स्पर्धेचे सामने सुरू आहेत. त्याच स्पर्धेचा एक सामना सुरू होता. त्यावेळेस एका संघाने गोल केला आणि त्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. या गोलच्या सेलिब्रेशनवरून दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ज्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. मैदानात खेळाडू एकमेकांना बुक्के मारू लागले. बघता बघता दोन्ही संघांचे खेळाडू, राखीव खेळाडू तसेच कोचिंग स्टाफचे सदस्यही या भांडणात उतरले. मैदान काही वेळासाठी अक्षरशः रणभूमीचे मैदान असल्याचे वाटत होते.
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहून रेफ्रीने एकामागोमाग कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली. मैदानात सुरू असलेली हाणामारी आणि बाचाबाची थांबवण्यासाठी रेफ्रीने तब्बल 53 वेळेस रेड कार्ड दाखवले. वाद शांत झाल्यावर पंचांनी सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि संबंधित सहकाऱ्यांना या कारवाईचा सामना करावा लागला.
🚨 एक ही मैच में 53 रेड कार्ड!🟥⚽
फुटबॉल इतिहास का सबसे खौफनाक विवादित मैच, गोल के जश्न के बाद भड़की ऐसी जंग कि मैदान बना जंग का अखाड़ा। 36 रेड कार्ड का पुराना वर्ल्ड रिकॉर्ड टूटा!👇
https://t.co/4jbpNe5AOe
#ViralNews #FootballWorldRecord #BrazilFootball #RedCard #NavbharatLive https://t.co/GmHbNjYyKG — Priya Jais (@JaisPriya43256) November 6, 2026
एकाच फुटबॉल सामन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रेड कार्ड दाखवण्याची ही पहिलीच वेळ असावी. या घटनेमुळे फुटबॉलच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक रेड कार्ड दाखवल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. ५३ रेड कार्ड्सची ही संख्या आतापर्यंतची सर्वोच्च ठरली आहे.
फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती
मैदानात सुरू असलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. रेफ्रीने एकापाठोपाठ रेड कार्ड दाखवण्याचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ब्राझीलमधील ज्युनियर फुटबॉलमधील सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Ans: ब्राझीलमध्ये अंडर-20 चॅम्पियनशिपच्या स्पर्धेचे सामने सुरू आहेत.
Ans: एकाच सामन्यात रेफ्रीने तब्बल 53 वेळेस रेड कार्ड दाखवले आहे.