Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हाती लागणार? ऋषभ पंतची जागा कोण घेणार?

मेगा लिलावापूर्वी दिल्ली फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आपला कर्णधार ऋषभ पंतलाही सोडले आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 17, 2024 | 03:14 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या रिटेन्शनमध्ये मोठे उलटफेज पाहायला मिळाले. यामध्ये अनेक संघानी मोठ्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि याचा धक्का क्रिकेट प्रेमींना लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने २०२४ आयपीएलचे जेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली जिंकले आणि केकेआरने आयपीएल २०२५ मधून श्रेयस अय्यरला रिलीज केले आहे. त्यानंतर क्रिकेट प्रेमींना दुसरा धक्का लागला तो म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत. मागील काही वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सची कमान रिषभ पंत कडे सोपवण्यात आली होती. आयपीएल २०२४ च्या लिलावामध्ये सुद्धा रिषभ सहभागी झाला होता. परंतु आयपीएल २०२५ मधून त्याला दिल्ली कॅपिटल्सने आता रिलीज केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन आयपीएल 2025 साठी एक नवीन संघ तयार करण्याच्या तयारीत आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने केवळ चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आपला कर्णधार ऋषभ पंतलाही सोडले आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 साठी आपला कर्णधार निश्चित केला आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली आता ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवणार आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण वृत्तांच्या मार्फत ही माहिती समोर आली होती.

क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

आयपीएल २०२४ च्या नंतर अपघातातून सावरत रिषभने संघामध्ये पुनरागमन केले होते त्याचबरोबर तो ऑक्शनमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. काही काळापूर्वी ऋषभ पंतनेही लिलावात जाण्याबाबत ट्विट केले होते. मात्र, त्यावेळी सर्वांनाच हा विनोद वाटला. रिषभ पंत आणि फ्रँचायझी यांच्यामध्ये गरमागरमीचे वातावरण असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर दिल्लीने पंतला सोडले तेव्हा सर्व अंदाज आणि अहवाल बरोबर ठरले. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रस्टन स्टब्सला 10 कोटी आणि अभिषेक पोरेलला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. तथापि, आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा कर्णधार कोण असेल याबाबत फ्रँचायझीने कोणतीही घोषणा केलेली नाही.

आयपीएल 2025 साठी प्रत्येक संघाचे पर्स मूल्य 120 कोटी रुपये आहे. आयपीएल रिटेन्शनच्या नियमानुसार सर्व संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडू कायम ठेवता येणार होते. दिल्ली कॅपिटल्सने एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. रिटेन्शनच्या आधी दिल्ली कॅपिटल्सकडे 120 कोटींपैकी दिल्लीने चार खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 43 कोटी 75 लाख रुपये खर्च केले आहेत. आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सकडे 76.25 कोटी रुपये असतील.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी हा लिलाव अधिक मनोरंजक होणार आहे कारण यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. मोठ्या खेळाडूंवर संघ कितीची बोली लावणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल.

Web Title: Who will lead delhi capitals who will replace rishabh pant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • cricket
  • Delhi Capitals
  • IPL 2025
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी
1

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान
2

IND vs WI 1st Test: बुमराहच्या फिटनेसवर सस्पेन्स कायम; दोन्ही कसोटी सामन्यांबाबत कर्णधार गिलचे मोठे विधान

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर
3

IND vs WI 1st Test Weather Report: अहमदाबाद कसोटी सामन्यावर पावसाचा गोंधळ; कसं असणार हवामान? वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट
4

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.