फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जसप्रीत बुमराह-कपिल देव : भारताचा संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 सज्ज झाला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने धारदार गोलंदाजी करून कांगारू संघाचे होश उडवले पाहिजेत. जसप्रीत बुमराहसाठी ही मालिका चांगली गेली तर तो माजी कर्णधार कपिल देवचा मोठा विक्रम मोडू शकतो. भारतीय संघाला ही मालिका मोठ्या फरकाने जिंकायची आहे, कारण भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्वबळावर अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिकेत 4-0 असा विजय आवश्यक आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची कौतुक फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये केले जाते. त्याच्यासमोर असलेल्या फलंदाजांचा फलंदाजी करताना घाम फुटत असतो. जसप्रीत बुमराहबद्दल बोललो तर, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार सामने खेळले आणि चांगल्या गतीने विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियामध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरणार आहे. या यादीत सध्या कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये 51 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये ५० हून अधिक बळी घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. या यादीमध्ये अनिल कुंबळे यांनी 49 विकेट्स घेतले आहेत ते सध्या दुसऱ्या स्थानावर, तर आर अश्विन 39 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत त्यांनाही या यादीमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. बिशन सिंग बेदी 35 चौथ्या स्थानावर आणि जसप्रीत बुमराह 32 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.
कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला अजूनही 20 विकेट्सची गरज आहे. बुमराहच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 5 पैकी 4 सामने खेळले तरी तो कपिल देवला विक्रम सहज मोडू शकतो. बुमराहने ऑस्ट्रेलियातील शेवटच्या कसोटी मालिकेत 20 हून अधिक बळी घेतले होते. मात्र, आर अश्विनलाही कपिल देवला मागे टाकण्याची संधी आहे, पण सांघिक संयोजनानुसार अश्विन कदाचित पहिल्या काही सामन्यांमध्ये बाहेर बसू शकतो. अखेर त्याला संधी मिळाली तर तोही कपिल देवला मागे टाकू शकतो. कपिल देवला मागे टाकण्यासाठी त्याला 13 विकेट्सची गरज आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तसं पाहिलं तर मोहम्मद शमीही या शर्यतीत आहे, पण या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, रणजी ट्रॉफीचे सामने खेळल्यानंतर तो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला असून त्याच्या कामगिरीतही सुधारणा झाल्याचे मानले जात आहे, मात्र त्याच्या ऑस्ट्रेलियाला जाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.