Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant : का सोडलं रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सला? स्वतः कोचने केलं स्पष्ट

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिषभ पंतला का सोडले? आता जुन्या टीम दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे प्रशिक्षक हेमांग बदानी यांचे विधान पंतच्या दाव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 09, 2024 | 02:02 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचे कोच : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा लिलाव मागील महिन्यामध्ये झाला. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस करण्यात आला. यामध्ये भारताचा खेळाडू रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्स रिषभ पंतला २७ कोटींना विकत घेतले आहे. लिलाव होण्याच्या एक महिन्याआधी रिषभ पंतने त्याच्या X अकाउंटवर ट्विट केले होते की “जर मी लिलावामध्ये आलो तर माझ्यावर किती बोली लागेल”.

आता जुन्या टीम दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. हेमांग बदानी म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण पंतने त्याचे बाजारमूल्य तपासण्याचे ठरवले होते. यामुळेच दिल्लीने प्रयत्न करूनही पंतला कायम करण्यात आले नाही. ऋषभ पंत आयपीएल लिलावात उतरला होता, जिथे त्याला इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. लखनौ सुपरजायंट्सने पंतवर २७ कोटींची बोली लावली, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आहे.

WTC Final : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कसा पोहोचणार? वाचा संपूर्ण समीकरण

दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक हेमांग बदानी यांचे विधान ऋषभ पंतच्या दाव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ऋषभ पंतने सोशल मीडिया X वर पोस्ट केले होते की त्याला कायम न ठेवण्यामागे कोणतेही आर्थिक कारण नाही. पण हे देखील खरे आहे की या पोस्टच्या दीड महिन्यापूर्वी पंत यांनी एक पोस्ट देखील केली होती ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की मला आपल्यासाठी किती मोठी बोली लागेल हे पाहायचे आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे नवे प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्यासोबत यूट्यूब शोमध्ये अनेक खुलासे केले. ऋषभ पंतशी संबंधित प्रश्नावर बदानी म्हणाले, ‘जर तुम्हाला एखाद्या खेळाडूला कायम ठेवायचे असेल, तर दोन्ही पक्षांना ते मान्य करावे लागेल. आम्ही त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. व्यवस्थापनाने त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक फोन कॉल्स आणि मेसेज आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

भारतासाठी ४ कसोटी आणि ४० एकदिवसीय सामने खेळलेला हेमांग बदानी पुढे म्हणाले की, ‘मी याबद्दल थोडा वेगळा विचार करतो. त्याला कायम ठेवायचे नव्हते. तो (पंत) म्हणाला की त्याला लिलावात जायचे आहे जेणेकरून बाजारातील मूल्य कळू शकेल. त्याला असे वाटले की आपण ठेवलेल्या कमाल रकमेपेक्षा जास्त रक्कम १८ कोटींपेक्षा मिळवू शकतो. त्याचा अंदाजही बरोबर होता त्याला २७ कोटी रुपये मिळाले. त्यांच्यासाठी चांगले. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आम्ही त्याला मिस करू. पण आयुष्य पुढे जातं.

If go to the auction. will I be sold or not and for how much ?? — Rishabh Pant (@RishabhPant17) October 11, 2024

Web Title: Why did rishabh pant leave delhi capitals the coach himself made it clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 02:02 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2025
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND VS  SA LIVE : दक्षिण आफ्रिकेचा 260 धावांवर डाव घोषित! भारतासमोर 549 धावांचे टार्गेट; पंत आर्मीला सुरवातीलाच 2 धक्के 
1

IND VS  SA LIVE : दक्षिण आफ्रिकेचा 260 धावांवर डाव घोषित! भारतासमोर 549 धावांचे टार्गेट; पंत आर्मीला सुरवातीलाच 2 धक्के 

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..
2

IPL 2026 : आजच्या दिवशीच Rishabh Pant ठरला होता सर्वात महागडा खेळाडू! IPL 2025 मध्ये 27 कोटींची लागली होती विक्रमी बोली..

IND vs SA : ऋषभ पंतच्या निष्काळजीपणामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर संतापाचा भडका!
3

IND vs SA : ऋषभ पंतच्या निष्काळजीपणामुळे चाहते नाराज, सोशल मीडियावर संतापाचा भडका!

Ind vs SA 2nd Test : भारतासाठी 30 वे कसोटी स्थळ निश्चित! पंत आणि बावुमा या दोन कर्णधारांकडून सामन्याचे उद्घाटन
4

Ind vs SA 2nd Test : भारतासाठी 30 वे कसोटी स्थळ निश्चित! पंत आणि बावुमा या दोन कर्णधारांकडून सामन्याचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.