Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षर पटेल होणार दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार? IPL 2025 मेगा लिलावापूर्वी मोठा खुलासा

IPL 2025 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला सोडले आहे. आता संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. यामध्ये अक्षर पटेलचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 11, 2024 | 09:17 PM
Will Axar Patel be The New Captain of Delhi Capitals A Big Revelation Before IPL 2025 Mega Auction

Will Axar Patel be The New Captain of Delhi Capitals A Big Revelation Before IPL 2025 Mega Auction

Follow Us
Follow Us:

Axar Patel Delhi Capitals Captain IPL 2025 : IPL 2025 मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले होते. अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल आणि कुलदीप यादव अशी या 4 खेळाडूंची नावे आहेत. लिलावाची तारीख जवळ येत आहे आणि ऋषभ पंतच्या सुटकेनंतर दिल्ली फ्रँचायझी कोणत्या खेळाडूला कर्णधार बनवू शकते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेलला दिल्लीचा कर्णधार बनवल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवीन कर्णधार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी हंगामात अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारू शकतो. आठवा की आयपीएल 2024 मध्ये, जेव्हा ऋषभ पंतला स्लो ओव्हर-रेटमुळे RCB विरुद्धच्या सामन्यातून तीन वेळा निलंबित करण्यात आले होते, तेव्हा अक्षर पटेलने पंतच्या जागी दिल्लीचे नेतृत्व केले होते. आगामी हंगामासाठी अक्षर पटेलला 16.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीने कायम ठेवलेला तो सर्वात महागडा खेळाडू आहे. हे देखील एक संकेत आहे की दिल्ली फ्रँचायझी अक्षरवर विश्वास ठेवण्यास तयार आहे.

अक्षर पटेल दिल्लीचा बनला स्टार
अक्षर पटेल 2019 पासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्याने DC फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करताना एकूण 82 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 967 धावा आणि 62 विकेट्स आहेत. दिल्लीकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. याआधी पंजाब किंग्जकडून 68 सामन्यात 686 धावा करण्यासोबतच त्याने 61 विकेट्सही घेतल्या होत्या.

पहिला अष्टपैलू खेळाडू

अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद मिळाल्यास तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करणारा भारताचा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरेल. जेम्स होप्स आणि जेपी ड्युमिनी हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी दिल्लीचे कर्णधारपद भूषवले आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीय अष्टपैलू खेळाडूने असे केले नाही. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीरसारखे फलंदाज आणि झहीर खानसारख्या दिग्गज गोलंदाजांनीही डीसीची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र अक्षर हा अष्टपैलू खेळाडू असल्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून इतिहास रचू शकतो.

दिल्लीने ऋषभ पंतला कायम ठेवण्याच्या यादीतून केले बाहेर

आयपीएल २०२५ च्या चर्चाना उधाण आलं आहे, भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंतने ट्विट केले होते आणि सोशल मीडियावर कॉमेंट्सचा वर्षाव झाला होता. अलीकडेच, ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीने ऋषभ पंतला कायम ठेवण्याच्या यादीतून बाहेर ठेवले आहे. संघाने अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु अद्याप या यादीची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, आता इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. असे सांगण्यात आले आहे की दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरवर दिल्ली संघाची नजर असेल.

ऋषभ पंतने केवळ दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडे कर्णधारपदाची मागणी केली नाही तर कोचिंग स्टाफच्या निवड प्रक्रिये संदर्भात त्याला हातभार लावायचा होता. पण दिल्ली संघाचे व्यवस्थापन पंतच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावर खूश नाही. त्यामुळे संघाने पंतला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिषभ पंतच्या सुटकेचा निर्णय एका रात्रीत घेण्यात आलेला नसून, हे मतभेद अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा : आश्चर्य! BCCI ने ज्या गोष्टीवर बंदी घातली; त्याचीच गौतम गंभीर करताहेत जाहिरात; कमवताहेत लाखो रुपये, नेटकऱ्यांनी घेतले तोंडसुख

हेही वाचा : विराट कोहली ते ऋतुराज गायकवाड; IPL 2025 मधील सर्व 10 संघांचे संभाव्य कर्णधार

Web Title: Will axar patel be the new captain of delhi capitals a big revelation before ipl 2025 mega auction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 09:17 PM

Topics:  

  • bcci
  • Delhi Capitals
  • IPL 2025
  • IPL 2025 mega auction
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?
1

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
2

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर
3

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
4

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.