IPL 2025 Captains List All Teams : IPL 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले होते. लिलावात सर्वांच्या नजरा ऋषभ पंत, जोस बटलर ते केएल राहुल यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंवर असतील. IPL चा 18वा सीझन देखील खास असेल कारण पंत आणि राहुलसह अनेक खेळाडूंना सोडण्यात आल्याने अनेक संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. चला तर मग एक नजर टाकूया IPL 2025 मध्ये सर्व 10 संघांचे संभाव्य कर्णधार कोण असू शकतात?
मुंबई इंडियन्स (हार्दिक पांड्या) – हार्दिक पंड्या आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल. एमआयचे नवे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हार्दिक मुंबईची जबाबदारी स्वीकारणार असल्याची पुष्टी केली आहे. हार्दिक 2024 मध्ये मुंबई संघात परतला, जिथे त्याने रोहित शर्माची जागा घेतली आणि कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.
चेन्नई सुपर किंग्स (ऋतुराज गायकवाड) – एमएस धोनीने आयपीएल 2024 मध्ये सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. धोनी पुढच्या हंगामात देखील खेळेल, परंतु 2024 मध्ये चेन्नईने गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती आणि 2025 मध्येही तो संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतो.
RCB (विराट कोहली) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 साठी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. विराट कोहली पुन्हा बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. गेल्या मोसमात कर्णधार असलेल्या फाफ डू प्लेसिसला आरसीबीने सोडले आहे.
KKR (जॉस बटलर) – कोलकाता नाइट रायडर्स मेगा लिलावात जोस बटलरला लक्ष्य करू शकते. बटलरकडे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाचा अनुभव असून तो केकेआरमध्ये आल्यास तो कर्णधारपदाचा सर्वात मोठा उमेदवार ठरू शकतो. बटलरने त्याच्या IPL कारकिर्दीत ३,५८२ धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (अक्षर पटेल) – दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला सोडले आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना दिल्लीने कायम ठेवले आहे. नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, अक्षर पटेलला IPL 2025 मध्ये दिल्लीचे कर्णधारपद दिले जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्स (संजू सॅमसन) – संजू सॅमसन 2021 पासून राजस्थान संघाचे नेतृत्व करत आहे. आगामी हंगामासाठी देखील, आरआरने सॅमसनला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. पुढील सत्रातही सॅमसन राजस्थानचा कर्णधार राहणार आहे.
पंजाब किंग्स (ऋषभ पंत) – ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले आहे, परंतु रिकी पाँटिंग त्याच्या अगदी जवळचा मानला जातो. आता पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या पाँटिंगला यावेळी पंजाब किंग्जमध्ये पाँटिंग आणि पंत यांची जोडी एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सनरायझर्स हैदराबाद (पॅट कमिन्स) – सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 18 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, SRH आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि तो पुढील हंगामासाठी देखील हैदराबाद संघाची जबाबदारी सांभाळू शकतो.
गुजरात टायटन्स (शुभमन गिल) – शुभमन गिलला 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद देण्यात आले होते, परंतु संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. यावेळी गिलला जीटीने 16.5 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले असून पुढील मोसमातही गुजरातची जबाबदारी त्याच्या हाती असेल.
लखनौ सुपर जायंट्स (निकोलस पूरण) – IPL 2025 पूर्वी LSG ने KL राहुलला सोडले. लखनौची रिटेन्शन लिस्ट समोर येताच पुरण यावेळी लखनौचा कॅप्टन बनणार असल्याचा दावा करण्यात आला. पूरणला लखनौने २१ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.