फोटो सौजन्य – सोशल मिडीया
टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्या झाल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे आशिया कप पर असणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. वर्ल्ड लिजेंडस चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला आणि त्यामुळे सामने रद्द करण्यात आले होते. अशिया कप आयोजित करण्यात आला आहे यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पहलगाम येथे 27 पर्यटकांनी त्यांचा जीव कमावला होता त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताने केले होते.
अधिकृतपणे भारत आशिया कपचे आयोजन करत असला तरी, पाकिस्तानशी असलेल्या तणावामुळे हे सामने तटस्थ ठिकाणी होत आहेत. प्रश्न असा आहे की भारत आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल का की इंडिया चॅम्पियन्सने WCL मध्ये पाकिस्तानसोबतच्या केवळ लीग स्टेजवरच नव्हे तर सेमीफायनलवरही बहिष्कार टाकला होता, त्याचप्रमाणे काहीतरी पाहायला मिळेल का?
कसोटीनंतर जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रूक T20 अवतारात, The Hundred मध्ये घातला धुमाकूळ
आशिया कपमध्ये भारत १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएईविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर, पुढचा सामना १४ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर ते स्पर्धेत ३ वेळा एकमेकांसमोर येतील. दरम्यान, ‘द नॅशनल’ मधील एका वृत्तात एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सीईओ शुभान अहमद यांच्या अहवालाने असा दावा करण्यात आला आहे की, आशिया कपमध्ये डब्ल्यूसीएलसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. म्हणजेच, भारत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार नाही.
शुभनने म्हटले आहे की, “आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही, परंतु आशिया कपची तुलना WCL सारख्या खाजगी कार्यक्रमाशी करणे योग्य नाही. जेव्हा आशिया कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात आली होती. हे निश्चितच देशांचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला WCL सारखी परिस्थिती येणार नाही.”
या वर्षी एप्रिलमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर निर्दयपणे ठार मारले. त्यानंतर, भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक हल्ल्यांसह पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
Asia Rugby U20s Sevens Championship 2025 : बिहारमध्ये 8 देशांमध्ये होणार विजेतेपदाची लढाई
दहशतवाद्यांना ठार मारल्याने आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर आणि काही धार्मिक स्थळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताने केवळ पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेत पाडली नाहीत तर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे सर्व हवाई तळ आणि लष्करी तळही उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकावे लागले आणि त्यांचे डीजीएमओ भारतीय समकक्षाकडे युद्धबंदीची विनंती करू लागले. भारताने अखेर युद्धबंदी स्वीकारली परंतु स्पष्ट इशारा दिला की ऑपरेशन सिंदूर फक्त पुढे ढकलण्यात आले आहे, संपले नाही. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.