फोटो सौजन्य - Lucknow Super Giants
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण वाढत चालले आहे. त्यामुळे कालच्या सामन्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे रोजी पंजाब किंग्सचा सामना धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सुरू होता. यावेळी या सामन्याचा खेळ सुरू असताना सामना थांबवण्यात आला आणि लगेचच खेळाडू आणि आलेल्या प्रेक्षकांना लगेचच मैदान सोडण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पुढे सामना चालू न ठेवता सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
कोलकाता आणि जयपूरनंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी, पोलिस सज्ज
आज सकाळी बीसीसीआयने स्पर्धा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे असे जाहीर केले आहे. अशावेळी आता काही प्रेक्षकांनी सामन्याची तिकिटे ही आधीच बुक केली होती त्यामुळे त्यांचे पैसे किंवा त्यांचे नुकसान होणार की त्यांना पुन्हा पैसे मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर सांगणार आहोत.
The decision was taken by the IPL Governing Council after due consultation with all key stakeholders following the representations from most of the franchisees, who conveyed the concern and sentiments of their players, and also the views of the broadcaster, sponsors and fans ;…
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
क्रिकेट चाहत्यांसाठी आता समोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच पुढील एक आठवड्याची ज्या प्रेक्षकांनी तिकिटे बुक केले आहेत त्यांचे पैसे मिळणार की नाहीत? इंडियन प्रीमियर लीग 2025 चे आत्तापर्यंत 58 सामने खेळवण्यात आले आहेत. यामधील पुढील सामने हे दिल्ली, हैदराबाद, मुंबई, बंगळूर, जयपूर आणि चेन्नई या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे आणि वाढलेला तणावाच्या वातावरणामुळे बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक हे पुढे ढकलले आहे त्यामुळे सामन्यांचे बुक केलेले तिकिटांचे पैसे तुम्हाला परत मिळणार की नाही यासंदर्भात तुम्हाला प्रश्न असेलच.
Update: Tonight’s match at BRSABV Ekana Cricket Stadium has been cancelled. Details regarding ticket refunds will follow. pic.twitter.com/AQlMt4M0z4
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 9, 2025
भारतीय नियमाक मंडळाच्या नियमानुसार, सामना पावसामुळे किंवा आपत्ती कारणामुळे रद्द झाल्यास खरेदी केलेल्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत दिले जातात. त्यामुळे आत्ता बीसीसीआयने खरेदी केलेला सामन्यांची तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत केले जाणार आहेत असे स्पष्ट सांगितले आहे. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रोखण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानने 8 मे रोजी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी सामना त्वरित थांबवण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारत-पाक तलावाच्या वातावरणामुळे सामन्याची ठिकाणे बदलले जाऊ शकतात.