फोटो सौजन्य - IndianPremierLeague
अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. देशाची आणि खेळाडूंची सुरक्षितता सर्वोपरि ठेवून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. कालचा सामना पंजाब आणि दिल्ली यांच्यामध्ये सुरू होता. हा सामना रोखून लगेचच सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांना स्टेडीयम सोडावे लागले. दरम्यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला एक धमकीचा मेल आला आहे.
यशस्वी जयस्वालने MCA समोर जोडले हात! आयपीएल 2025 दरम्यान खेळाडूने घेतला मोठा निर्णय
या मेलमध्ये, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी आहे. वृत्तसंस्था आयएएनएसने ही माहिती दिली. हे मैदान आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड आहे. ११ मे रोजी दिल्ली आणि गुजरात टायटन्स यांच्यात येथे सामना होणार होता. या प्रकरणी डीडीसीएने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, डीडीसीएला पाठवलेल्या मेलमध्ये असे लिहिले आहे की, “तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमचे भारतात पाकिस्तानी स्लीपर सेल आहेत जे सध्या बरेच सक्रिय आहेत. हा स्फोट ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल.”
The Arun Jaitley Stadium received a bomb threat via email on Friday morning, and a police complaint has been registered, a top DDCA official told IANS. “There will be a bomb blast in your stadium. We have a committed Pakistan sleeper cell active in India. The blast will be our… pic.twitter.com/vkOgUEY5DT
— IANS (@ians_india) May 9, 2025
काल धर्मशाळा येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच थांबवण्यात आला. पाकिस्तानी हल्ल्यानंतर अनेक भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आले. धर्मशाळा देखील यात सामील होता ज्यामुळे स्टेडियमचे फ्लडलाइट्स बंद करण्यात आले. स्टेडियम ताब्यात घेतल्यानंतर, सैन्याने दोन्ही संघांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये नेले आणि स्टेडियम सहज रिकामे केले. तथापि, स्टेडियमला बॉम्बची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आयपीएल दरम्यान, कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमलाही असाच धोका मिळाला होता. याशिवाय जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम आणि गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या.
IPL 2025 Suspended : उर्वरित आयपीएलचे सामने कधी सुरू होणार? बीसीसीआयने सांगितली तारीख