Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिटमॅन’ वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलसा!

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल तेव्हा रोहीत शर्माचा शेवटचा सामना असेल बोले जात आहे. अशातच रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मोठे विधान केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 11, 2025 | 09:47 PM
'हिटमॅन' वनडे क्रिकेट लाभ निवृत्ती? रोहित शर्मा बालपण संघर्षाने मोठा खुलासा केला!

'हिटमॅन' वनडे क्रिकेट लाभ निवृत्ती? रोहित शर्मा बालपण संघर्षाने मोठा खुलासा केला!

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma’s retirement : भारत नुकताच इंग्लड दौऱ्यावरून परतला आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थित शानदार कामगिरी केली. इंग्लडविरुद्ध पाच सामान्यांच्या मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. अशातच भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. या दौऱ्यापूर्वी बातम्या येत आहेत की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा ऑस्ट्रेलिया दौरा हा शेवटचा दौरा असण्याची शक्यता आहे. यावर आता रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भाष्य केले आहे.

लाड यांनी म्हटलं आहे की, ‘रोहितने २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळावे.’ २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवण्यात येणार आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२७ या कालावधीत असणार आहे.

नेमकं काय म्हणाले दिनेश लाड?

दिनेश लाड म्हणाले की, रोहितने २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळत राहावे. आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून दोन वर्षांहून अधिक कालावधी बाकी आहे. दरम्यान, त्याआधी भारत अनेक एकदिवसीय सामने खेळणार आहे, परंतु या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल शासंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटला फुलस्टॉप? BCCI कडून मोठा खुलासा; वाचा सविस्तर..

यावेळी रोहितला २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकातून वगळण्यात आल्याच्या घटनेची आठवण करून देत, लाड म्हणाले की, “उजव्या हाताच्या फलंदाजाकडे अजूनही देशासाठी योगदान देण्याची ‘भूक’ आणि ‘निर्धार’ बाकी आहे.”

रोहितने २०२७ चा विश्वचषक खेळावा : लाड

लाड यांनी आयएएनएसला सांगितले की, “रोहित शर्माने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायला हवे. ट्रॉफी जिंकणे हे त्याचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. तथापि, तो २०११ च्या विजयी संघाचा भाग असण्याची संधी गमावली आहे. रोहित संघाचे नेतृत्व करेल की नाही हे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांवर अवलंबून असणार आहे, परंतु तो विश्वचषक संघाचा भाग असायला हवा.”

हेही वाचा : पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला ग्रहण का लागले? रोहित शर्माच्या प्रशिक्षकाने केला ‘हा’ खळबळजनक खुलासा..

रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द

रोहित शर्माने भारतासाठी २७३ एकदिवसीय सामने खेळून त्यात ३२ शतके आणि ५८ अर्धशतकांसह ११,१६८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तीन द्विशतके करण्याचा विक्रम देखील केला आहे.

Web Title: Will rohit sharma retire from odi cricket childhood coach dinesh lads statement is in the news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
3

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
4

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.