मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami to return to Test cricket: तंदुरुस्तीच्या कारणाने भारतीय कसोटी संघाबाहेर असलेला मोहम्मद शमी आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. मोहम्मद शमीने जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघासाठी आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेला आहे. तेव्हापासून तो दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर असून अद्याप त्याला संघात पुनरागमन करता आलेले नाही………
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, मोहम्मद शमीने पहिल्या डावात २९ ओव्हर टाकून १२२ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स आणि दुसऱ्या डावात १६.३ षटकांत ३९ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. तथापि, भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर शमीला वेस्ट इंडिज मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात देखील त्याची निवड होऊ शकली नाही. तंदुरुस्तीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. भारत-इंग्लंड कसोटी मालिके संपल्यानंतर एका आठवड्यानंतर, बीसीसीआयच्या एका सूत्राने शमीबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की, ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला फॉर्ममुळे नाही तर त्याच्या तंदुरुस्तीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
शमीने आतापर्यंत ६४ सामन्यांमध्ये २२९ बळी टिपले आहेत. तो म्हणाला की संघ जाहीर करण्यापूर्वी बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी शमीकडून सल्ला घेण्यात आला होता, परंतु तो स्वतः त्याला तंदुरुस्तीबद्दल खात्री नव्हती.
द टेलिग्राफमधील एका वृत्तानुसार, सूत्रा सांगण्यात आले की, शमी फिटनेसमुळे इंग्लंडला जाऊ शकला नाही. हेच त्यांमागे एकमेव कारण होते. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकला नाही. त्यानंतर इंग्लंड मालिकेसाठी त्याच संघात असणं महत्त्वाच होतं. निवडकर्त्यांनी संघ ठरवण्यापूर्वी त्याच्याशीही चर्चा देखील केली होती, परंतु तो फारसा आत्मविश्वास दाखवू शकला नाही. निवडकर्त्यांना आवश्यक असलेली आवश्यक आश्वासने त्याच्याकडून देण्यात अली नाही.
सूत्रानुसार, शमीचे कसोटी भविष्य अद्याप खूप बाकी आहे, त्याला इतक्यात थांबा लागू शकत नाही, परंतु ते २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याचा फॉर्म आणि फिटनेसवर बरेच काही ठरणार आहे. त्याशिवाय, शमी स्वतः कसोटी संघात परतण्यास इच्छुक आहे का हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. जर शमी २०२५ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशनच्या नेतृत्वाखालील संघाकडून चांगला खेळला, तर मात्र त्याला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघात संधी देण्यात येऊ शकते.