फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंडीयन प्रिमियर लीग 2025 मध्ये चेन्नईच्या संघाने फार काही चांगली कामगिरी केली नाही. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला आयपीएल 2025 मध्ये दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागली होती त्यानंतर एमएस धोनीने कर्णधारपद सोपवले होते. सध्या भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावर आहे. याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल 2025 मध्ये फलंदाजी मध्ये फारच काटकसर करावी लागली होती. संघामध्ये अनेक नवीन बदल देखील करण्यात आले.
स्पर्धेच्या मध्यात आयुष म्हात्रे, डेव्होल्ड ब्रेविस ज्यांसारख्या युवा खेळाडूंना संघामध्ये सामील करण्यात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता आता चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल २०२६ मध्ये कोणत्या नवे बदल करणे याकडे क्रिकेट चाहत्याचे लक्ष लागले आहे. तथापि, संघाच्या कामगिरीतही सुधारणा झाली नाही. त्याच वेळी, एमएस धोनीने आयपीएल २०२६ मध्ये रुतुराज गायकवाडच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
चेन्नई येथे एका कार्यक्रमादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, “पूर्वी आम्हाला आमच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल खूप काळजी वाटत होती, पण आता मला संघाचा फलंदाजीचा क्रम बराच स्थिर दिसतोय. ऋतुराज गायकवाड जखमी झाला होता पण आता तो परत येईल. त्याच्या पुनरागमनामुळे सीएसकेची फलंदाजी अधिक व्यवस्थित होईल.” धोनीने संकेत दिले आहेत की ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसतील. याशिवाय, सीएसके पुढील हंगामासाठी लिलावात काही नवीन खेळाडूंवरही पैज लावेल.
ते पुढे म्हणाले, “आम्ही आयपीएल २०२५ मध्येही कोणतीही हलगर्जीपणा केला नाही, परंतु काही कमतरता होत्या ज्या आम्ही आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावात दूर करण्याचा प्रयत्न करू.” चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, परंतु आयपीएल २०२५ त्यांच्यासाठी खूप वाईट ठरले.
🚨💥💛 MS Dhoni at the MaxiVision Launch !!..
Dhoni – “Rutu will be back, and with the additions in the second half of tournament, our batting order looks sorted. Yes, there are a few holes to plug in – December mini auction will be key!” 🔥💛 pic.twitter.com/7wNwaokaLX
— TheXReplier (@ReplySensei) August 2, 2025
या हंगामात सीएसकेने १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले, तर १० सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सीएसके संघ पॉइंट्स टेबलमध्ये १० व्या स्थानावर होता. त्याच वेळी, धोनीची कामगिरी देखील फारशी खास नव्हती. धोनीच्या फलंदाजीच्या क्रमावर बरीच टीका झाली. आता नवीन हंगामात तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे पाहायचे आहे.