
School State Level Hockey Tournament
दरम्यान, शनिवारी दुपारी २ वाजता १४ वर्षाआतील मुले व मुलींच्या वयोगटातील अंतिम निकालात १४ वर्ष मुले या वयोगटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभागाने तर तृतीय क्रमांक मुंबई या विभागाने प्राप्त केला. तसेच मुलींच्या वयोगटात प्रथम क्रमांक कोल्हापूर विभागाने तर पुणे व मुंबई विभागाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. प्राविण्य प्राप्त संघातील खेळाडूस प्रमाणपत्र, मेडल्स व संघास ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
यावेळी सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष पोलिस उपअधीक्षक रवींद्र राठोड, तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार विद्यामंदिरचे प्राचार्य अलगर सामी तसेच सहकार विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक पवार हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथीचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंग्रे यांनी तर तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत मंडले यांनी केले.
स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय हॉकी १४, १७ वर्षांआतील मुले, मुली क्रीडा स्पर्धा उत्कृष्टपणे आयोजित होण्याकरिता आणि खेळाडुंना उच्चत्तम सुविधा मिळण्याकरिता विधानपरिषद सदस्य, आ. धिरज रामभाऊ लिंगाडे यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक विकास निधीतून २ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे खेळाडुंना उच्चत्तम सुविधा मिळण्यास मदत होत आहे.
Ans: बुलढाण्यातील सहकार विद्यामंदिर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली.
Ans: पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. तर, मुलींच्या गटा कोल्हापूर विभागाने प्रथम क्रमांक मिळवला.
Ans: आमदार धीरज लिंगाडे यांनी स्थानिक विकास निधीतून २ लाख रुपये उपलब्ध करून दिले.