Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shefali Verma Record: शेफाली वर्माची T20 World Cup 2026 मध्ये तुफानी खेळी! वर्ल्ड रेकॉर्ड बनवत रचला इतिहास

ICC महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शफाली वर्माने भारतीय संघासाठी उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत महत्त्वपूर्ण विक्रमही प्रस्थापित केला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 18, 2026 | 10:06 AM
शेफाली वर्माचा नेदरलँड्सविरूद्ध विक्रम (फोटो सौजन्य - Instagram)

शेफाली वर्माचा नेदरलँड्सविरूद्ध विक्रम (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाने पाकिस्तान आणि त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध प्रभावी विजय मिळवला आहे
  • शेफाली वर्माचा विक्रम 
  • भारतीय महिला संघ क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी शेफाली वर्माचे कौतुक 
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपला सलग दुसरा विजय नोंदवला. संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत केले. यापूर्वी भारताने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मंधानाने भारतीय संघासाठी ७४ धावांची दमदार खेळी केली. मंधानासोबतच शफाली वर्मानेही एक शानदार अर्धशतक झळकावले.

या अर्धशतकाव्यतिरिक्त, शफालीने गोलंदाजीनेही कहर केला. तिने ३.२ षटकांत केवळ २० धावा देऊन तीन बळी घेतले. त्यापूर्वी तिने ३८ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या होत्या. यासह, शफाली टी-२० विश्वचषक सामन्यात अर्धशतक आणि तीन बळी घेणारी जगातील केवळ तिसरी खेळाडू ठरली. शेफालीच्या आधी, हा पराक्रम २०१८ मध्ये वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने श्रीलंकेविरुद्ध केला होता. मॅथ्यूजने त्या सामन्यात ६२ धावा केल्या आणि तीन बळी घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सुने लुसने २०२० मध्ये थायलंडविरुद्ध ६१ धावा आणि तीन बळी घेत हा पराक्रम केला.

IND W Vs NED W Live: स्मृती अन् शेफालीची ‘हाय व्होल्टेज’ बॅटिंग! टीम इंडियाने ठोकल्या २०९ रन्स

कसा होता खेळ

या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०९ धावांचा डोंगर उभा केला. मंधाना आणि शेफाली व्यतिरिक्त, रिचा घोषने २० धावा आणि जेमिमा रॉड्रिग्जने १९ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ धावा आणि दीप्ती शर्माने १० धावा केल्या. नेदरलँड्सकडून कॅरोलिन डी लँगने ४ षटकांत ३२ धावा देऊन २ बळी घेत सर्वाधिक बळी घेतले, तर मिर्थ व्हॅन डेन राड, हेदर सीगर्स आणि आयरीस झ्विलिंग यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.

नेदरलँड्सची फलंदाजी अपयशी ठरली

भारताच्या २०९ धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँड्सची फलंदाजी अत्यंत सुमार ठरली. कर्णधार बॅबेट डी लीडने संघासाठी सर्वाधिक २८ धावा केल्या. हेदर सेगर्सने २१ धावा, तर स्टेर कॅलिसने १८ धावांचे योगदान दिले. या तिघींव्यतिरिक्त नेदरलँड्सची संपूर्ण फलंदाजी कमकुवत दिसत होती. गोलंदाजी विभागात, शफाली वर्माने टीम इंडियासाठी तीन बळी घेतले, तर श्री चरणीने चार षटकांत १९ धावा देऊन चार बळी घेतले. नंदिनी शर्माने दोन, तर दीप्तीने एक बळी घेतला.

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Web Title: Women s t20 world cup shefali verma scored fifty only 3rd player in the world and took 3 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • cricket news
  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs NED
  • Shefali Verma

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
3

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
4

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.