Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Chess World Champion : ‘अनेक तरुणींना प्रेरणा..’, बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले. दिव्याच्या या विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 28, 2025 | 08:42 PM
Women’s Chess World Champion: ‘Inspiration to many young women..’, Prime Minister Modi congratulates Divya, the winner of the Chess World Cup

Women’s Chess World Champion: ‘Inspiration to many young women..’, Prime Minister Modi congratulates Divya, the winner of the Chess World Cup

Follow Us
Close
Follow Us:

Prime Minister Narendra Modi congratulates Divya Deshmukh : महाराष्ट्राच्या १९ वर्षीय कन्या दिव्या देशमुखने जगात भारताची मान उंचावली आहे. नागपूरच्या दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह दिव्याने विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केले आहे. या विजयाने दिव्यावर कौतुकाचा सर्व क्षेत्रातून वर्षाव होत आहे. दरम्यान दिव्याच्या या विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : Chess World Cup : महाराष्ट्राची लेक बनली ६४ घरांची ‘राणी’! कोनेरू हम्पीला पराभूत करून दिव्या देशमुख बनली बुद्धिबळ विश्वविजेती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे FIDE महिला विश्वचषकात विजय मिळवल्या अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, दोन उत्कृष्ट भारतीय खेळाडूंच्या सहभागाने हा एक ऐतिहासिक अंतिम सामना होता. मोदींनी ‘एक्स’ वर लिहिले की “दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना. २०२५ मध्ये FIDE महिला जागतिक बुद्धिबळ विजेता बनलेल्या तरुणी दिव्या देशमुखचा अभिमान आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. हे अनेक तरुणींना प्रेरणा देईल.”

हेही वाचा : PHOTOS : युवा गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा नवा कारनामा! 46 वर्षापूर्वीच्या ‘त्या’ विक्रमाशी साधली बरोबरी..

A historic final featuring two outstanding Indian chess players! Proud of the young Divya Deshmukh on becoming FIDE Women’s World Chess Champion 2025. Congratulations to her for this remarkable feat, which will inspire several youngsters. Koneru Humpy has also displayed… pic.twitter.com/l7fWeA3qLw — Narendra Modi (@narendramodi) July 28, 2025

दिव्याने सोमवारी जॉर्जियातील बटुमी येथे टायब्रेकरमध्ये अनुभवी देशबांधव असणाऱ्या कोनेरू हम्पीला हरवून विश्वविजेतेपद पटकावले. हा विजय म्हणजे तिच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा आहे. पुढे मोदी म्हणाले की, “अंतिम फेरीत दिव्याची प्रतिस्पर्धी कोनेरू हम्पीनेही संपूर्ण चॅम्पियनशिपमध्ये अपवादात्मक कौशल्य दाखवले.” मोदी यांनी यावेळी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताने चीनची भिंत भेदून विजेतेपद मिळवले..

भारताच्या दोन्ही खेळाडूंनी चिनी भिंत तोडून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिडे विश्वचषक नॉकआउट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, ३८ वर्षीय कोनेरू हम्पी आणि १९ वर्षीय दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत अनेक चिनी खेळाडूंवर मात केली. महिला गटात चीन टॉप १०० मध्ये अव्वल स्थानावर आहे. चीनच्या १४ खेळाडूंनंतर, भारतातील ९ खेळाडू टॉप १०० मध्ये येतात. परंतु फिडे विश्वचषकामध्ये कोनेरू आणि दिव्या यांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चिनी खेळाडूंना पराभूत करत भारताचा दबदबा दाखवला.

Web Title: Womens chess world champion prime minister modi congratulates divya on winning the chess world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • Divya Deshmukh
  • Divya Deshmukh vs Koneru Humpy
  • Naredra Modi

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ‘या’ हिरव्या शेंगा, नियमित सेवन केल्यास आरोग्याला होतील जबरदस्त फायदे
2

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ‘या’ हिरव्या शेंगा, नियमित सेवन केल्यास आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन
3

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन

बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान; ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन केला गौरव
4

बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान; ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन केला गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.