
भारत विरूद्ध पाकिस्तानचे वर्ल्ड कप २०२७ मधील समीकरण (फोटो सौजन्य - Crickinfo)
शुभमन गिलच्या नेतृत्वान्वये भारतीय संघ ७ ऑक्टोबरपासून धूमधडाक्यात या स्पर्धेला सुरूवात करेल. पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला जाणार आहे. मात्र चाहत्यांसाठी सर्वाधिक मोठा सामना ठरणार आहे तो म्हणजे १० ऑक्टोबर रोजी खेळला जाणारा भारत आणि पाकिस्तानचा सामना! यावेळी चाहत्यांना ३ वेळा हे संघ भिडताना पहायला मिळणार आहे नक्की हे गणित कसं आहे ते आपण समजून घेऊया.
विश्वचषक २०२७ चे फॉर्मेट यावेळी अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे की, क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धीदरम्यान ३ वेळा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळू शकते. दोन्ही संघादरम्यान पहिला सामना १० ऑक्टोबरला रंगेल. त्यानंतर दोन्ही संघ हे पुढे चांगल्या पद्धतीने खेळले आणि जिंकत गेले तर नॉकआऊट सामन्यात २ वेळा समोरासमोर येण्याची संधी यावेळी उपलब्ध झाली आहे.
World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज
ग्रुप स्टेज संपल्यानंतर दोन्ही ग्रुपमधून टॉप ३ असणाऱ्या संघाना सरळ सुपर ७ मध्ये प्रवेश देण्यात येईल. दर दोन्ही गटाच्या चौथ्या स्थानावर असणाऱ्या संघांमधून जो संघ चांगली कामगिरी करेल त्या संघाला ७ वे स्थान प्राप्त करता येईल. सुपर 7 टप्प्यात, मागील सामन्यांचे गुण पुढे नेले जाणार नाहीत आणि सर्व सात संघ एकमेकांविरुद्ध राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळतील. 25 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा सामने खेळेल, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना जवळपास निश्चित मानला जात आहे.
सुपर 7 टप्पा संपल्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल चार संघ नॉकआऊट फेरीसाठी, म्हणजेच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी अव्वल चारमध्ये स्थान मिळवले, तर चाहत्यांना २१ नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात या दोन बलाढ्य संघांना तिसऱ्यांदा आमनेसामने आलेले पाहता येईल.
ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
२०२३ मध्ये विश्वचषक मिळवण्याचे स्वप्नं धुळीला मिळाले होते. त्यामुळे भारताचे जखमी वाघ अर्थात सर्व खेळाडू हे अत्यंत महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरतील. मागच्या वेळी १० संघाचा समावेश होता तर अंतिम सामन्या अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ६ विकेट्सने पराभूत करत सर्वांचे स्वप्नं चक्काचूर केले होते. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी संघाने ९ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले होते आणि ५ सामन्यात पराभव मिळवत पाचव्या स्थानावर झेप घेतली होती. चाहते आता आतुरतेने पुढील वर्षाची वाट पाहत आहेत हे मात्र नक्की!