फोटो सौजन्य - Women's Premier League (WPL) सोशल मीडिया
महिला प्रीमियर लीग २०२५ : वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ हंगामाच्या चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सने परभाव केला. १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने फक्त २ विकेट गमावून लक्ष्य गाठले. या हंगामात आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे. वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ अपडेटेड पॉइंट्स टेबल- महिला प्रीमियर लीग २०२५ चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, आरसीबी कर्णधार स्मृती मानधनाच्या वादळाने डीसीला धक्का बसला आणि आरसीबीने ८ विकेट्सने मोठा विजय मिळवला.
महाराष्ट्र केसरी वादाला फुटलं तोंड, शिवराज राक्षे यांनी चौकशी समितीवर व्यक्त केली नाराजी
१४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने चांगली सुरुवात केली. स्मृती मानधना आणि डॅनिएल वायट-हॉज यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. डॅनिएल वायट-हॉज ४२ धावा करून बाद झाली. त्याने ही खेळी ३३ चेंडूंमध्ये खेळली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार मारले. दरम्यान, कर्णधार स्मृती मानधनाने शानदार अर्धशतक झळकावले. कर्णधारपदाची खेळी करत तिने एकटीने संघाला विजयाकडे नेले. स्मृती मानधनाने ४७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीदरम्यान १० चौकार आणि ३ षटकार मारले. शेवटी, पेरी आणि रिचा यांनी संघाला विजयाकडे नेले.
2️⃣ Points ✅
🔝 of the Table ✅#RCB Fans Happy 🥳Dominant performance from the Defending Champions to sum up a thumping 8️⃣-wicket victory 👏
Scorecard ▶ https://t.co/CmnAWvkMnF#TATAWPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/EAeYhqfLCx
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 17, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि लेग-स्पिनर जॉर्जिया वेअरहॅम यांनी शानदार गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तिच्याशिवाय किम गार्थ (१९ धावांत दोन बळी) आणि एकता बिश्त (३५ धावांत दोन बळी) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. दिल्लीचा संघ फक्त १९.३ षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे आता दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयाचा फायदा संघाला WPL २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये मिळाला . सलग दोन सामने जिंकून गतविजेता आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. या विजयासह आरसीबीचा नेट रन रेटही लक्षणीयरीत्या वाढला आहे, संघाचा नेट रन रेट आता +१.४४० आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला आरसीबी हा एकमेव संघ आहे.
सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी लढत आहे. आरसीबीविरुद्धच्या या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सला पराभव पत्करावा लागला आहे आणि संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. डीसीला नेट रन रेटमध्येही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. डीसीच्या पराभवामुळे गुजरात जायंट्स दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. दिल्ली आणि गुजरातचे गुण समान आहेत पण नेट रन रेटमुळे जीजी दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचे खाते अद्याप उघडलेले नाही.