फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
महाराष्ट्र केसरी वाद : महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या लढतीत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती पाहायला मिळाली. या अंतिम सामान्यांच्या कुस्तीमध्ये पंचाचा निर्णय वादामध्ये सापडला आहे. त्यावरून सध्या मोठा वाद महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. शेवटच्या फायनलच्या कुस्तीमध्ये शेवटच्या लढतीचा निकाल लागला नाही आणि त्यामुळे अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला आणि यावेळी फायनलमध्ये अंपायरने दिलेल्या निर्णयानंतर वाद झाला होता आणि या वादामध्ये शिवराज राक्षे याची पंचासोबत बाचाबाची झाली होती. हा वाद बाचाबाची पर्यत न थांबता राक्षे याने पंचाला लाथ देखील मारली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आता शिवराज राक्षे यांनी समितीला ओपन चॅलेंज दिले आहे आणि सांगितले आहे की, पृथ्वीराज आणि माझी कुस्ती पुन्हा लावा. एवढेच नव्हे तर शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामधील झालेल्या शेवटच्या फायनलच्या सामान्यांच्या निकालावरून नाराजी व्यक्त करून म्हणाले आहे की, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पाच सक्षम तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली. मात्र, यावर देखील शिवराज राक्षे याने नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांच्यासोबत मोठे वाद पाहायला मिळाला. नेमलेली चौकशी समिती अमान्य असल्याचं राक्षेने म्हटलं आहे.
IPL 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! नजर टाका टॉप ऑर्डरवर
शिवराज राक्षे याने स्टेजवर कुस्ती झाल्यानंतर वाद घालत पंचाला लाथ मारली आणि यानंतर त्याने सांगितले आहे की, महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये कुस्तीचा निकाल लागला नसताना अंपायरने अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. त्यानंतर मी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी यांच्याकडे जबाब मागितला. जेव्हा मी जबाब मागायला गेलो तेव्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माझी मागणी मान्य केली नाही त्याच्या उलट माझ्यावर तडकाफडकी निर्णय घेऊन तीन वर्षांच्या बंदी घालण्यात आली. मग ज्यांच्याकडे मी उत्तर मागितले तेच चौकशी समितीत नेमलेले पदाधिकारी काय वेगळे निर्णय घेणार होते? असा प्रश्न डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुढे शिवराज राक्षे म्हणाला की, मी कुस्ती हरलेलो नाही, अंपायरने चुकीचा निर्णय दिला. त्याचवेळी मी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, साईड पंच यांच्याकडे मागणी केली, तरीही माझं ऐकून घेण्यात आलं नाही. सामन्यानंतर त्यादिवशी रात्री ११ वाजता माझ्यावर बंदी घालण्यात आली. जेव्हा पंचानी निर्णय घेतला यावेळी मी त्यांना बऱ्याचदा सांगितले की, व्हिडीओ पाहून निर्णय घ्या, असं मी वारंवार सांगितले. पण त्यावेळी कोणत्याही अंपायरने माझं ऐकल नाही. चौकशी समितीकडे मी त्यावेळी मागणी केली असता मला निर्णय दिला नाही. यावेळी वेगळं काय होणार आहे? असा सवाल देखील शिवराज राक्षे याने विचारला आहे.