Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2025 : डिफेन्डिंग चॅम्पियनची पॉइंट्स टेबलमध्ये वाईट स्थिती, या संघाने मारली पहिल्या स्थानावर उडी

२ विजयांनंतर, आरसीबीला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे पॉइंट टेबलमध्ये आरसीबीचे स्थान आणखी वाईट होत चालली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 28, 2025 | 08:31 AM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला प्रीमियर लीग गुणतालिका : काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना झाला. या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये चांगली सुरुवात केली. तर दुसरीकडे गुजरात जायंट्सची स्पर्धेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. आरसीबीने त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने सलग जिंकले होते, पण आता आरसीबी विजयी मार्गावरून जात असल्याचे दिसून येत आहे. २ विजयांनंतर, आरसीबीला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे पॉइंट टेबलमध्ये आरसीबीचे स्थान आणखी वाईट होत चालली आहे.

हार्दिक पंड्या भारतीय संघाचा अमूल्य खेळाडू, नजर टाका आकडेवारीवर, या दिग्गज खेळाडूने केला दावा

आरसीबीचा गुजरात जायंट्सकडून पराभव

गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी, महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. गुजरातने हा सामना ६ विकेट्सने जिंकला होता. गुजरातचा हा हंगामातील दुसरा विजय असला तरी, आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होता. महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात जायंट्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाचे ५ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबी संघ ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीचा नेट रन रेट +०.१५५ आहे.

चौथ्या स्थानावर युपी वॉरियर्सचा संघ आहे, युपीच्या संघाने ५ सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी तीन सामने गमावले आहेत तर दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे युपीचा संघ ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सचे ५ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. WPL २०२५ च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईचे ४ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Clinical bowling performance 🤝 A captain’s knock#GG get back to winning ways with a dominant 6️⃣-wicket victory👏💪 Scorecard ▶️ https://t.co/G1rjRvSkxu#TATAWPL | #RCBvGG | @Giant_Cricket pic.twitter.com/V0294LMcn6 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 27, 2025

गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचा अहवाल

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आरसीबीने २० षटकांत ७ गडी गमावून १२५ धावा केल्या. बंगळुरूच्या टॉप ऑर्डरने खूपच निराशा केली. स्मृती मानधना किंवा एलिस पेरी दोघेही जास्त काळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. आरसीबीकडून कनिका आहुजाने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली, तिच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. आरसीबीविरुद्धच्या या धावांचा पाठलाग करताना, गुजरात जायंट्सची कर्णधार अ‍ॅशले गार्डनरने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह ५८ धावांची शानदार खेळी केली. गुजरातने ६ विकेट्स आणि २१ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

Web Title: Wpl 2025 royal challengers bengalurus poor position in the points table the team jumps to the first position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • cricket
  • WPL 2025

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.