Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

ODI Series : भारताने मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीसह कर्णधार शुभमन गिलने खणखणीत शतक झळकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 10:06 PM
ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सनं विजय
  • भारताचे फलंदाज सर्वोत्तम लयात
  • कर्णधार शुभमन गिलचे दणदणीत शतक
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिल्या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या विक्रमासह रचलेल्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजला 9 षटकं हातात शिल्लक राखून तब्बल 8 विकेटने लोळवलं. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने भारतासमोर 7 बाद 295 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या धुरंधरांनी कोणतीही घाई न करता आपल्या कौशल्याच्या जोरावर विजयश्री खेचून आणली

तिरुअनंतपूरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानात प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या भारताला सुरुवातीला थोडं बॅकफूटला जावं लागलं. पॉवर प्लेमध्ये विंडिजचे फलंदाज चांगले फॉर्मात होते. पण फिरकीपटू कुलदीप यादवच्या जादुई फिरकीसमोर अखेरच्या सत्रात वेस्ट इंडिजची मधली फळी अक्षरशः ढेपाळली.
एक वेळ विंडीज 400 धावा पार करते की, काय अशी परिस्थिती होती, पण भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.

 

किंग कोहलीचा मैदानात धुमाकूळ

हा सामना विराट कोहलीसाठी खूपच महत्त्वाचा होता. एक तर तर त्याला वनडेतील 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 59 धावांची गरज होती, तर दुसरीकडे आपली विकेट राखून त्याला संघाला विजय मिळवून द्यायचा होता. त्याने अर्धशतक गाठल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनंतर 15 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
किंग कोहली एवढ्यावरच थांबला नाही, त्याने खणखणीत शतक झळकावत संघाला विजयी करून देण्याचे उद्दीष्ट पूर्ण केले. त्याने 88 चेंडूंत 10 चौकार व 9 गगनचुंबी षटकार ठोकून नाबाद 139 धावा पूर्ण केल्या. त्याला त्याआधी भारताचा कर्णधार शुभमन गिल (110) कडून चांगली साथ लाभली. गिलने 108 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार ठोकला.
सलामीवीर रोहित शर्माने 35 धावांत 2 चौकार व 3 षटकार ठोकत भारतीय क्रिकेट चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. चौथ्या क्रमांकावर आलेला ऋतुराज गायकवाड 13 धावा करत नाबाद राहिला. भारताने विंडीजने दिलेल्या धावांचा पाठलाग अवघ्या 41.4 षटकात 2 बाद 300 धावा करत पार केल्या.

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

कुलदीपने सामना फिरवला

पहिल्या डावात 40 धावांवर 4 विकेट घेत फिरकीपटू कुलदीप यादवने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना दबावात आणले. कुलदीपने विंडीजकडून शतक झळकावणारा जस्टीन ग्रेव्स (101)ला जास्त आक्रमक होऊ दिले नाही. तर कर्णधार शाई होप (12), सलामीवीर जॉन कॅम्पबेल (62) यांचा काटा ही कुलदीपनेच काढला.
मधल्या फळीतील अमेर जँगो वेस्ट इंडिजकडून 58 धावा करत नाबाद राहिला. अमेरच्या खेळीमुळेच वेस्ट इंडिज सन्मानाजनक 295 धावांचा टप्पा गाठू शकली. नाही तर भारतीय गोलंदाजांनी लय पकडत त्यांचा गेम सुरूच केला होता. पण अमेर आपली विकेट टिकवून खेळला.
कुलदीपनंतर भारतासाठी प्रसिद्ध क्रिष्णा (2 विकेट) व नितिश कुमार रेड्डी (1 विकेट) चांगली गोलंदाजी केली. रवींद्र जडेजा, गुरनुर बरार आणि नमन धीर या सामन्यात चालले नाहीत. आता भारताचा पुढील वनडे सामना 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये पार पडेल.

Virat Kohli : ‘किंग’ने मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा

Web Title: Odi series india beat west indias 8 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:06 PM

Topics:  

  • cricket
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे
1

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
2

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
3

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
4

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.