Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार… 

महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा पहिला सामना आज 9 जानेवारी रोजी एमआय आणि 2024 चॅम्पियन आरसीबी यांच्यात होणार आहे. दरम्यान आरसीबीची खेळाडू पूजा वस्त्रकार २०२६ च्या डब्ल्यूपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 09, 2026 | 06:05 PM
WPL 2026: A major blow for RCB before the first match! This star all-rounder will miss the opening game...

WPL 2026: A major blow for RCB before the first match! This star all-rounder will miss the opening game...

Follow Us
Close
Follow Us:

Pooja Vastrakar will miss some matches in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आज या हंगामातील पहिला सामना 9 जानेवारी रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि 2024 चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मागील हंगामात आरसीबीची कामागिरी निराशाजनक राहिली होती. परंतु, अशातच 2026 मधील हंगाम होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा झटका बसला आहे. संघाची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकर सुरुवातीच्या काही सामन्यात खेळताना दिसणार नाही.

हेही वाचा : धक्कादायक! रणजी क्रिकेटपटूचे सामन्यादरम्यान मैदानात कोसळून निधन! BCCI कडून शोक व्यक्त

आरसीबीची सदस्य पूजा वस्त्रकर पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध असणार आहे. पूजा अजून देखील पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही. ती अनफिट असून बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तिच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. आरसीबी पहिल्या सामन्यात विजयाकडे लक्ष केंद्रित देत असताना, पहिल्याच सामन्यापूर्वी प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

आरसीबी प्रशिक्षक काय म्हणाले?

पूजा वस्त्राकरच्या तंदुरुस्तीबाबत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक मलोलन रंगराजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलोलन रंगराजन म्हणाले की, तिच्या पुनर्वसनात काही अडचणी आल्या असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिला डिस्चार्ज दिला जाणार होता. खांद्याच्या दुखापतीमुळे ती पुनर्वसनासाठी तिथे गेली असताना तिला बरे होण्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. तिला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. आम्हाला आशा आहे की ती लवकरच संघात सामीलन होणार. वृत्तानुसार, पूजा पुढील आठवड्यानंतर संघात सामील  होणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : Vijay hazare trophy : न्यूझीलंडविरुद्ध डावललेल्या ऋतुराजने रचला इतिहास!ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला मागे टाकत केला ‘हा’ कारनामा

पूजा वस्त्राकरची क्रिकेट कारकीर्द

२०२६ च्या आयपीएल लिलावामध्ये भारताची स्टार अष्टपैलू पूजा वस्त्राकरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.पूजा ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज असून तिने भारतीय संघासाठी ७२ टी-२० सामन्यांमध्ये ५८ बळी टिपले आहेत. दुखापतीमुळे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या संघाबाहेर आहे. पूजा वस्त्राकर यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून मैदानात खेळताना दिसली होती.  एमआयसाठी १६ सामन्यांमध्ये तिने १२६ धावा फटकावल्या होत्या. तसेच तिने ७ बळी घेतले आहेत. पूजा वस्त्राकर एक प्रभावी गोलंदाज असून तिच्या समावेशामुळे आरसीबीची गोलंदाजी नक्कीच मजबूत होणार आहे. हंगामाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये तिची गैरहजेरी संघासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Wpl 2026 rcbs pooja vastrakar will miss the opening match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Women's Premier League 2026
  • WPL 2026

संबंधित बातम्या

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना
1

MI vs RCB : ओपनिंग सामन्यात कशी असेल नवी मुंबईची खेळपट्टी? डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील
2

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

WPL 2026 : आजपासून महिला प्रीमियर लीग  2026 चा होणार शुभारंभ! नवी मुंबईत रंगणार MI vs RCB यांच्यात सामना
3

WPL 2026 : आजपासून महिला प्रीमियर लीग 2026 चा होणार शुभारंभ! नवी मुंबईत रंगणार MI vs RCB यांच्यात सामना

WPL 2026 : मुंबई इंडियन्स वुमेन्स टीमसोबत भागीदारी कायम: ऊषा इंटरनॅशनलने केली मोठी घोषणा 
4

WPL 2026 : मुंबई इंडियन्स वुमेन्स टीमसोबत भागीदारी कायम: ऊषा इंटरनॅशनलने केली मोठी घोषणा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.