मिझोरम रणजी ट्रॉफी क्रिकेटपटू के. लालरेमृत यांचे निधन(फोटो-सोशल मीडिया)
K. Lalremruata collapsed and died during the match: मिझोरम रणजी ट्रॉफी क्रिकेटपटू के. लालरेमृत यांचे सामन्यादरम्यान कोसळून निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोरमने आयोजित करण्यात आलेल्या खालिद मेमोरियल सेकंड डिव्हिजन स्क्रीनिंग टूर्नामेंट दरम्यान ही दुख:द घटना घडली आहे. त्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून माजी मिझोरम रणजी खेळाडू के. लालरेमृत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आले आहे.
बीसीसीआयने त्यांच्या देशांतर्गत खात्यावर लिहिले आहे की, “मिझोरम क्रिकेटपटू के. लालरेमृत यांच्या निधनाने खूप दुःख झाले असून त्यांनी रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मिझोरमचे प्रतिनिधित्व केले होते. बीसीसीआय त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि मिझोरम क्रिकेट समुदायाला मनापासून शोक आणि प्रार्थना व्यक्त करते.”
हेही वाचा : IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण
खालिद मेमोरियल सेकंड डिव्हिजन स्क्रीनिंग टूर्नामेंट दरम्यान हा प्रकार घडला. गुरुवारी सकाळी सिहमुई येथील सुआका क्रिकेट ग्राउंडवर अधिकृत सामन्यादरम्यान के. लालरेमृत व्हीआरसीसीकडून मैदानात फलंदाजी करत होते. हा सामना ILMOV क्रिकेट क्लब विरुद्ध सुरू होता. फलंदाजी संपवल्यानंतर लालरेमृताने छातीत तीव्र दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ते काही वेळातच खाली कोसलळे, ज्यामुळे सहकारी खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांमध्ये भीती परसली.
त्यानंतर तेलवकरच बेशुद्ध पडले. त्यांना ताबडतोब वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले, परंतु काही एक उपयोग होऊ शकला नाही. क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोरमने एका निवेदनात म्हटले आहे की, दुसऱ्या विभागीय स्पर्धेत खेळताना लालरेमृताला पक्षाघाताचा झटका आला. असोसिएशनने त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि त्याचे निधन मिझोरम क्रिकेटसाठी मोठे नुकसान असल्याचे देखील म्हटले आहे.
लालरेमृता यांनी रणजी ट्रॉफीच्या दोन आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सात सामन्यांमध्ये मिझोरमचे प्रतिनिधित्व केलेले. ते स्थानिक पातळीवर अनेक क्लबसाठी देखील खेळलेले आहेत. यष्टीरक्षक लालरेमृताने 2018 मध्ये मेघालय विरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले होते आणि 2022 मध्ये नागालँड विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. .
लालरेमृताच्या निधनानंतर, असोसिएशनकडून गुरुवारी खेळवण्यात येणारे सर्व सामने रद्द करण्यात आले आहे. तसेच ते सुधारित वेळापत्रकानुसार खेळवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.






