ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल मीडिया)
Ruturaj Gaikwad has made history : विजय हजारे ट्रॉफीचा लीगचा टप्पा संपला असून महाराष्ट्राला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले आहे. तथापि, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे. लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकावले. गोव्याविरुद्ध खेळताना गायकवाडने १३४ धावांची खेळी केली. ज्यामुळे महाराष्ट्राला जयपूरमध्ये पाच धावांनी विजय मिळवण्यात मदत झाली. या विजयानंतर मात्र ऋतुराजच्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळाव्या लागल्या.
हेही वाचा : IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण
गोव्याविरुद्धच्या १३४ धावांची खेळी करत ऋतुराज गायकवाडने त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीत ५,००० धावा पूर्ण केल्या. तसेच या दरम्यान त्याने त्याची सरासरी ५८.८३ पर्यंत वाढवली, जी आता या स्वरूपामध्ये किमान ५० सामने खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक अशी आहे. अशा प्रकारे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकेल बेवनचा ५७.८६ चा सर्वकालीन विक्रम देखील पिछाडीवर टाकला आहे. हा पराक्रम त्याने ४२७ सामन्यांमध्ये (३८५ डाव) १५१०३ धावा करून साधला आहे.
ऋतुराज गायकवाडला संघातून डच्चू दिल्यानंतर, माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाकडून निवड प्रक्रियेवर आपले मत व्यक्त करण्यात आले आहे. उथप्पाचा असा विश्वास आहे की जे खेळाडू भारताच्या “तीन मोठ्या राज्यांमधून” – मुंबई, दिल्ली किंवा पंजाबमधून येत नाहीत त्यांना नेहमीच भारतीय संघात त्यांचे स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हानाचा सामना करावा लागतो.
हेही वाचा : IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई
उथप्पा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही मुंबई, दिल्ली किंवा पंजाबसारख्या मोठ्या क्रिकेट राज्यांमधून येत नसाल तर तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावे लागत असते. अशा खेळाडूंसाठी संघात राहण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. ” उथप्पा पुढे असे देखील म्हटलं की, ऋतुराज गायकवाडला या काळात सकारात्मक मानसिकता राखण्याची आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची जास्त आवश्यकता आहे.






