Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC 2025 Final : अखेर २७ वर्षांनंतर South Africa ची स्वप्नपूर्ती; कांगारूंना धूळ चारत प्रोटीज संघ बनला ‘World Test Champion’

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला आहे

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 14, 2025 | 05:30 PM
WTC 2025 Final: Finally, South Africa's dream comes true after 27 years; Proteas team defeats Kangaroos to become 'World Test Champions'

WTC 2025 Final: Finally, South Africa's dream comes true after 27 years; Proteas team defeats Kangaroos to become 'World Test Champions'

Follow Us
Close
Follow Us:

SA vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना पार पडला. सगळ्या क्रीडा जगताच्या नजरा या फायनल सामान्याकडे लागून होत्या. साऊथ आफ्रिकेने हा सामना ५ विकेट्सने जिंकून इतिहास रचला आहे. १९९८ नंतर पहिल्यांदा आयसीसीची स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या २८१ च्या टार्गेटला साऊथ आफ्रिका संघाने एडन मारक्रमच्या १३६ धावांच्या   जोरावर पूर्ण केले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. एडण मारक्रम आणि साऊथ आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा ही जोडी या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपला होता. २१२ धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गारद झाला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडे ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यापुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्क आणि जोस हेझलवूड यांनी  १० व्या गड्यासाठी १३६ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची भागीदारी रचली आणि संघाला २८१ धावांपर्यंत पोहचवले. साऊथ आफ्रिकेला विजयासाठी २८१ धावा करायच्या होत्या.

हेही वाचा : कोणत्या संघाने सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत? वाचा संपूर्ण यादी

𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆🇿🇦 South Africa take home the 𝐌𝐚𝐜𝐞 👏#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/Yy4C4AQEO7 — ICC (@ICC) June 14, 2025

खेळाच्या तिसऱ्या दिवशी २८१ या भल्यामोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेची सुरवात मात्र चांगली झाली नाही. रायन रिकेल्टन ६ धावा करून झटपट बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यांनंतर आलेला वियान मुल्डर आणि एडन मारक्रम यांनी साऊथ आफ्रिकेचा डाव सांभाळत आक्रमक फलंदाजी केली.परंतु, १८ व्या षटकात साऊथ आफ्रिकेचा स्कोअर ७० असताना साऊथ आफ्रिकेला वियान मुल्डरच्या रूपात दूसरा झटका बसला. त्याला २७ धावांवर मिचेल स्टार्कने आपला बळी बनवले. त्यानंतर मैदानावर साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा फलंदाजीसाठी आला. त्यांनंतर मात्र मारक्रम आणि बावुमा या जोडीने तिसऱ्या दिवस शेवटपर्यंत खेळून काढला आणि साऊथ आफ्रिकेला विजयाच्या जवळ पोहचवले. या जोडी कांगारूच्या गोलंदाजीला पूर्ण निष्प्रभ करून टाकले त्या दोघांनी  मोठी भागीदरी रचत संघाला विजयासमीप नेले.

 

तिसऱ्या दिवसाच्या अखेर दोन्ही खेळाडू नाबाद राहिले. तेव्हा एडनने १०० धावा पूर्ण केल्या होत्या तर बवूमाने ६५ धावांवर नाबाद होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मात्र बवूमा एका धावेची भर घालून माघारी परतला. त्याला पॅट कमिन्सने ६६ धावांवर बाद केले. टेम्बा बावुमानंतर ट्रिस्टन स्टब्स मैदानात आला. परंतु, त्याला देखील जास्त वेळ थांबता आले नाही.  त्याला ८ धावांवर मिचेल स्टार्कने आपल्या जाळ्यात ओढून त्रिफळा उडवला. त्यांनंतर विजयाच्या उंबरठ्यावर असताना एडन मारक्रम १३६ धावांवर बाद झाला. त्याला हेझलवुडने माघारी धाडले. एडन मारक्रमने २०७ चेंडूत १३६ धावा केल्या. डेव्हिड बेडिंगहॅम २१ धावा तर काइल व्हेरेन ४ धावांवर नाबाद राहून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली. तर नॅथन लायनच्या पदरी मात्र निराशा आली.

हेही वाचा : पाकिस्तानला मोठा झटका! आणखी एका प्रशिक्षकाचा संघाला टाटा, बाय-बाय; PCB चा वाद चव्हाट्यावर..

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड. 

Web Title: Wtc 2025 final south africa defeats kangaroos to become world test champions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • Aiden Markram
  • SA vs AUS
  • Temba Bavuma
  • WTC Final 2025

संबंधित बातम्या

SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कणा असलेला ‘हा’ खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
1

SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कणा असलेला ‘हा’ खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी 
2

SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी 

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पाजलं पाणी! मालिका केली नावावर, 5 धावांनी मिळवला विजय
3

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पाजलं पाणी! मालिका केली नावावर, 5 धावांनी मिळवला विजय

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर
4

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.