फोटो सौजन्य : X
सर्वाधिक आयसीसी ट्राॅफी जिंकणारे संघ : सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनलच्या सामन्याच दुसरा दिवस सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ हा आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्याचे आयोजन हे लंडनमधील लाॅर्ड्स मैदानावर करण्यात आले आहे. या सामन्याचे तीन दिवस संपले आहेत आणि आज म्हणजेच चौथ्या दिवशी निकाल येणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून इतिहास रचण्याच्या जवळ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फक्त आता विजयासाठी 69 धावांची गरज आहे.
कांगारू संघ आफ्रिकेला जिंकू न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून 69 धावा दूर आहे आणि त्यांच्याकडे 8 विकेट शिल्लक आहेत.तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेचा स्कोअर २१३/२ होता. एडेन मार्कराम (१०२*) आणि टेम्बा बावुमा (६५*) क्रीजवर आहेत. जर आफ्रिकेने WTC फायनलचा हा सामना जिंकला तर ते २७ वर्षांपासून त्यांच्या कपाळावरचा ‘चोकर्स’चा कलंक पुसून टाकतील. अशा परिस्थितीत, आज जाणून घेऊया कोणत्या देशाने सर्वाधिक वेळा ICC ट्रॉफी जिंकली आहे?
सर्वाधिक आयसीसी ट्राॅफी जिंकण्याच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत 10 ट्राॅफी जिंकल्या आहेत, कांगारुच्या संघाने 1987, 1999, 2003, 2007, 2015, 2023 या वर्षी आयसीसी विश्वचषक जिंकला आहे तर १ वेळा आयसीसी टी२० विश्वचषक नावावर केला आहे. 2006 आणि 2009 या वर्षामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलियन संघाने संघाने जिंकली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्राॅफी ही 2 वेळा जिंकली आहे.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर भारताचा संघ आहे भारताच्या संघाने आतापर्यंत सात आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियाने 2 विश्वचषक 1983 आणि 2011 या दोन वर्षे जिंकले होते. T20 विश्वचषक दोन वेळा भारताचे संघाने जिंकले आहेत 2007 आणि 2024 मध्ये भारतीय संघाने टी-ट्वेंटी विश्वचषक नावावर केले होते. भारतीय संघाने तीन वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे 2002, 2013 आणि 2025 या वर्षांमध्ये भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा संघ आहे वेस्ट इंडिजच्या संघाने आतापर्यंत पाच आयसीसी प्रोफे जिंकले आहेत दोन वेळा विश्वचषक त्याचबरोबर t20 विश्वचषक हा त्यांनी दोन वेळा जिंकला आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी एक वेळा जिंकली आहे.
ICC च्या या महत्वाच्या नियमात होणार बदल! आता बाउंड्रीवर कॅच बेकायदेशीर मानले जाणार, वाचा सविस्तर
पाकिस्तानच्या संघाकडे आत्तापर्यंत 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत एक वेळा एक दिवसीय विश्वचषक तर t20 देखील त्यांनी एक वेळा जिंकला आहे आणि एक वेळा चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले होते. श्रीलंकाच्या संघाने आतापर्यंत तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. एक एकदिवसीय विश्वचषक त्याचबरोबर t20 विश्वचषकदेखील एक वेळा जिंकला आहे आणि एक वेळा संयुक्तपणे चॅम्पियन ट्रॉफी भारतासह जिंकली आहे. या यादीमध्ये सहाव्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे इंग्लंडच्या संघाने एक वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि दोन वेळा t-20 विश्वचषक जिंकला आहे.
सर्वाधिक एससीसी ट्रॉफी जिंकण्याच्या यादीमध्ये सातव्या स्थानावर न्युझीलँडचा संघ आहे न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी एक चॅम्पियन ट्रॉफी आणि एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये आत्तापर्यंत एकच वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी 1998 मध्ये जिंकली होती.