
११ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
मुलींच्या गटात जानवी नलावडे (५० किलो), सिद्धी गबाजी शिंदे (५९ किलो), अवनी अनिल औटी (६२ किलो), समृद्धी शिवाजी जाधव (६५ किलो), तनवी रामदास जाधव (७२ किलो) आणि समीक्षा गोरक्ष माळी (७६ किलो) यांनी आपापल्या वजनी गटांत प्रथम क्रमांक मिळवित विजेतेपद पटकावले. प्राजल नानाभाऊ दाते (५७ किलो) आणि अनुष्का निलेश शिंदे (६१ किलो) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलांच्या गटात करण केशव बांगर (६३ किलो), सिद्धेश नवनाथ विश्वासराव (६७ किलो), धनंजय खंडू बेलकर (८० किलो), विघ्नेश पवार (८२ किलो) आणि प्रणव माने (९७ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सोहम नितीन शेलार (४१ किलो), साई बाबाजी दिघे (४८ किलो) आणि जीवन बांगर (१३० किलो) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. अशा प्रकारे समर्थ क्रीडा संकुलाच्या एकूण १६ कुस्तीपटूंनी तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविले असून, त्यापैकी ११ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कामगिरीमुळे समर्थ क्रीडा संकुलातील कुस्ती प्रशिक्षणाला मिळणारे सकारात्मक परिणाम अधोरेखित झाले आहेत.
यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्रा. चंद्रकांत कोकरे, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, संजय कंधारे आणि शाम फुलपगारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि अश्विनी जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव करून तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.समर्थच्या कुस्तीपटूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके आणि प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.