फोटो सौजन्य – Instagram
भारत विरुद्ध इंग्लड याच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका ड्राॅ झाली, त्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे आशिया कपवर असणार आहे. भारतीय संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने त्याच्या लहान कारकिर्दीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, त्याने भारताच्या संघासाठी झालेल्या इंग्लडविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी मालिकेमध्ये 2 शतके झळकावली आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबई संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही असे पूर्णपणे मनाशी ठरवले होते.
त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देखील मागितले होते. मागील बऱ्याच वृत्तांच्या माहितीनुसार यशस्वी जयस्वाल हा गोवा इकडे जायचं आहे असे सांगत होता. एमसीएने दिलेला माहितीनुसार आता असे म्हटले जात आहे की त्याने एनओसी देखील दिली होती. पण त्यानंतर त्याला एक व्यक्तीने मुंबईमध्ये खेळण्यास राजी केले. आणि ही व्यक्ती दुसरी दुसरी कोणी नसून भारताचा करण्यासार रोहित शर्मा हा आहे. रोहित शर्माच्या आग्रहामुळेच यशस्वी जयस्वाल मुंबईकडून खेळत राहू इच्छित आहे.
Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत
मुंबई मिररमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मानेच यशस्वी जयस्वालला मुंबई संघात ठेवले होते. अहवालात, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणतात, “रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मुंबई संघासोबत राहण्यास सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की मुंबईसाठी खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे, कारण या संघाने ४२ रणजी जेतेपदे जिंकली आहेत. रोहितने यशस्वीला असेही सांगितले की, मुंबईने तुला व्यासपीठ दिले हे विसरू नको, त्यानंतर तू इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमवत आहेस.
रोहितने यशस्वीला असेही सांगितले की, मुंबई शहराला विसरू नको, कारण तू येथील मैदानांवर वयोगटातील क्रिकेट खेळली आहेस.” अजिंक्य नाईक पुढे म्हणाले, “यशस्वी जयस्वाल यांनी रोहित शर्मा आणि भारत आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर दिग्गजांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एमसीएला एनओसी मागे घेण्यासाठी ईमेल केला आणि आम्ही त्यांची विनंती मान्य केली आहे.” जयस्वाल यांनी एप्रिल महिन्यात एमसीएकडून एनओसी मागितली होती.
🚨 ROHIT SHARMA ASKED YASHASVI JAISWAL TO STAY IN MUMBAI 🚨
MCA President Ajinkya Naik said “Rohit asked Yashasvi to stay on in Mumbai at this stage of his career – he explained to Yashasvi that there was a lot of pride & Prestige in playing for a team like Mumbai which has won… pic.twitter.com/TS7ORhaMhY
— Johns. (@CricCrazyJohns) August 7, 2025
जयस्वाल यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले की त्यांना गोव्यात का जायचे आहे? तथापि, पुढच्याच महिन्यात त्यांनी एमसीएला एनओसी मागे घेण्याची विनंती केली आणि आता तो पुन्हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार आहे.