फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच प्राथमिक कसोटी मालिका पार पडली, या या मालिकेत सिरीज ड्रॉ राहिली. आता टीम इंडियाचे लक्ष हे अशिया कप 2025 वर असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन युनायटेड अरब येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या आज संघाचे विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. पहिला गट हा भारत, ओमन, पाकिस्तान आणि युएई असा असणार आहे तर दुसऱ्या गटांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, हॉंगकॉंग आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
भारताच्या संघाचे तीन सामने खेळवले जाणार आहेत पहिला सामना हा युएई विरुद्ध होणार आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारताचा 14 सप्टेंबर रोजी सामना आयोजित करण्यात आला आहे. साखळी सामन्याचे शेवटचा सामना हा टीम इंडियाचा ओमन विरुद्ध असणार आहे. आता भारतीय संघाची कमान ही आशिया कप मध्ये कोणाच्या हाती असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 9 सप्टेंबर पासून आशिया कप सुरू होणार आहे परंतु अजून पर्यंत बीसीसीआयने मिळण्याची घोषणा केलेली नाही.
DPL 2025 च्या वेळापत्रकात बदल, आता हे 2 सामने 13 ऑगस्ट ऐवजी 12 ऑगस्ट रोजी होणार
अनेक वृतांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव हा आशिया कपच्या वेळी भारतीय संघामध्ये पुनरागमन करणार आहे अशी चर्चा आहे. तर काही वृत्तांच्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहेत की हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे अशी अटकळ बांधली जात आहे. भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल याला क्रिकेटच्या त्याने नव्या अवतारात पाहिले.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये त्याने भारताच्या संघाला चांगले दोन सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे आता निवडकर्त्यांची निवड काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता आशिया कपला भारतीय संघाची कॅप्टन्सीच्या शर्यतीमध्ये तीन खेळाडू आहेत. आता भारताची कमान निवडकर्ते कोणाच्या हाती देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.