Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर; अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी

Yashasvi Jaiswal To Replace Virat Kohli in AFG ODI series: अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली संघाबाहेर पडला आहे. आता, बीसीसीआयने त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 06:15 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर
  • मालिकेसाठी ‘या’ युवा खेळाडूला संधी
  • मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मुल्लांपूर येथे एकच कसोटी सामना खेळला जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. परंतु, सामन्याच्या काही दिवस उरले असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला. बीसीसीआयने त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची संघात निवड केली आहे.

15 वर्षाच्या Vaibhav Sooryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री; इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, सचिनचा 37 वर्षांचा विक्रम मोडणार?

आयपीएल फायनलदरम्यान झाली दुखापत

३१ मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान विराट कोहलीला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात फलंदाजी करताना कोहलीला त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्या आगामी मालिका खेळण्यावर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वैद्यकीय तपासणीनंतर कोहलीला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोहलीला पूर्णपणे फिट होण्यासाठी अंदाजे ६ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर करताना, सैकिया यांनी पुष्टी केली की कोहली अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकणार नाही. सैकिया यांनी सांगितले की, संघात कोहलीच्या जागी यशस्वी जैस्वालला स्थान देण्यात आले आहे. यशस्वी हा एकमेव कसोटी सामन्यासाठीच्या भारतीय संघाचाही भाग आहे.

विराट कोहलीच्या तंदुरुस्तीबाबत मुख्य निवडकर्ता अजिगरकर म्हणाले की, ‘विराटला दुखापतीतून बरे होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे सध्या सांगता येत नाही. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी तो फिट होईल अशी आशा आहे.’

BCCI Hon. Secretary Mr. Devajit Saikia informs that Yashasvi Jaiswal will replace the injured Virat Kohli for the #INDvAFG ODI series.#TeamIndia pic.twitter.com/cLxfK7gByz — BCCI (@BCCI) June 6, 2026

जैस्वालसमोर स्वतःला सिद्ध करण्याची संधी

विराटच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही एक मोठी संधी असेल. यशस्वीने आतापर्यंत भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळले असून १७१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, यशस्वीने गेल्या वर्षी दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले होते. आता त्याला पुन्हा एकदा कोहलीची जागा घेण्याची संधी देण्यात आली आहे.ड केली आहे.

मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका १३ जूनपासून सुरू होणार असून, यातील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवला जाईल. यानंतर पुढील दोन सामने १७ आणि २० जून रोजी लखनौ आणि चेन्नई येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेपूर्वी, ६ जूनपासून मुल्लानपूर येथे एकच कसोटी सामनाही खेळला जात आहे.

IND vs AFG: रणजी ते टीम इंडिया! कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी कॅप मिळताच ‘मिस्ट्री स्पिनर’ चर्चेत

Web Title: Yashasvi jaiswal replaces virat kohli india vs afghanistan odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Virat Kohli
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
1

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
2

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
3

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
4

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.