Team India will be shaken! 'Yorker King' Jasprit Bumrah hints at retirement; said, 'I have priorities..'
Jasprit Bumrah Test Retirement : आयपीएल २०२५ चा १८ व्या हंगाम हा त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय आहे. आता अशीच एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या दौऱ्यापूर्वी आता जसप्रीत बुमराहच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
भारतीय संघ पुढील महिन्यात म्हणजे २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आले आहे. तथापि, जसप्रीत बुमराह बीसीसीआयची पहिली पसंती असल्याचे म्हटले जात होते, परंतु त्याच्या फिटनेसमुळे तो शर्यतीतून बाहेर पडला आणि गिलला कर्णधार बनवण्यात आले.
हेही वाचा : French Open : Jannik Sinner चा धामकेदार विजय, तर Novak Djokovic ची देखील तिसऱ्या फेरीत धडक..
जसप्रीत बुमराहने अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कशी संवाद साधला. ज्यामध्ये त्याने वर्कलोड व्यवस्थापन, कुटुंब आणि अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली. त्याच्या या गोष्टीवरून, आता चाहते त्याच्या निवृत्तीबद्दल अंदाज बांधत असल्याचे दिसत आहेत.
क्लार्कच्या पॉडकास्ट बियॉन्ड २३ वर बोलत असताना बुमराह म्हणाला की त्याचे कुटुंब हीहे त्याच्या कारकिर्दीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. तसेच जसप्रीत बुमराह म्हणाला की, “माझ्यासाठी कुटुंब माझ्या कारकिर्दीपेक्षा खूप महत्वाचे आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की ते स्थिर आहे. मी दोन गोष्टी गांभीर्याने बघत आहे. एक माझे कुटुंब आणि एक माझा खेळ, पण कुटुंब ही प्रथम येते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला प्राधान्यक्रम ठरवावे लागत असतात आणि मी प्राधान्यक्रम ठरवतो कारण मी नेहमीच क्रिकेटपटू राहू शकणार नाही. कुटुंबासाठी तर मी क्रिकेटपटू नसून मी एक माणूस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एक तरुण वडील आपल्या मुलाकडे पाहत असताना कसे वाटते. तो चेंडू उचलू लागला आणि चेंडूने खेळू देखील लागला, जे सध्या तरी योग्य नाही.”
फिटनेसबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, ” कोणत्याही व्यक्तीसाठी इतक्या दिवसांपासून खेळत राहणे फार कठीण असते. मी हे काही काळापासून बघत आहे. खेळत आहे, परंतु शेवटी तुम्हाला हे देखील बघावे लागते की, तुमचे शरीर कोणत्या दिशेने झुकत आहे.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही तुमच्या शरीराचा वापर कशा पद्धतीने करता याबद्दल थोडे निवडक आणि हुशार असायाला पाहिजे. एक क्रिकेटपटू म्हणून मी कधीही काहीही सोडण्यास इच्छित नाही. नेहमीच पुढे जात राहायचला पाहिजे. पण मी लक्ष्य ठेवत नाही किंवा संख्या देखील पाहत नाही. जेव्हा जेव्हा मी त्याकडे लक्ष दिले तेव्हा मी ते साध्य करू शकलो नाही.” असे बूमराह म्हणाला.