शाहिद आफ्रिदी(फोटो-सोशल मीडिया)
Shahid Afridi welcomed by Kerala people : जम्मू काश्मीरमधील पहालगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये २६ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येऊ लागले. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यांतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा भारता विरुद्ध सतत आग ओकत होता. भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
हेही वाचा : MI vs GT : हिटमॅन ‘शो’ कायम! IPL मध्ये Rohit Sharma ने केली ‘ही’ दमदार कामगिरी..
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, आफ्रिदी स्टेजवर पोहोचताच कार्यक्रमाचे सांस्कृतिक सादरीकरण थांबवण्यात आले. त्यांनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी “बूम बूम” असा जयघोष करत त्याचे स्वागत करण्यात आले. तेव्हा स्टेजवर आफ्रिदी म्हणाला की त्याला भारत, विशेषतः केरळ आणि त्याचे जेवण खूप आवडते. तसेच तो विनोदाने म्हणाला, की “हो गया बूम बूम.”
हा व्हिडिओ व्हायरल होताच वापरकर्त्यांचा संताप झाला आहे. केरळच्या लोकांकडून आफ्रिदीचे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले ते पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की शत्रू आपल्याच देशाचे आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर या लोकांवर जोरदार टीका देखील केली आहे.
What a shame!! – Desperate Keralites welcome this Anti-India Paki with ‘Boom Boom’ at an event in Dubai, especially after Pahalgam terror attack and his venomous stand against India pic.twitter.com/F8Fuigxu4s
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 30, 2025
पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदी म्हणाला होता की, भारतात फटाके फुटले तरी त्याला जबाबदार पाकिस्तानला धरले जाते. तसेच तो भारतीय सैन्यावर टीका करताना म्हणाला की, काश्मीरमध्ये ८ लाख सैनिक असून देखील जर हल्ला झाला तर याचा अर्थ असा की तुम्ही लोक सुरक्षेत अपयशी ठरला आहात.
आफ्रिदीने भारतीय माध्यमांना “बॉलिवूड ड्रामा” असे संबोधले होते. त्याने भारतीय क्रिकेटपटूंना देखील टार्गेट केले होते. त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आफ्रिदी हा सतत भारताविरुद्ध विष ओकत राहिला होता.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)’ ने स्वीकारली होती, जी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे.