
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण (Sharad Pawar Tested Corona Positive) झाली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान शरद पवारांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळताच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यांची चौकशी करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
[read_also content=”काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध पेटले संतप्त भाजपचे तीव्र आंदोलन, जोडे मारा, घोषणाबाजी तर पोस्टर जाळण्याचेही प्रकार https://www.navarashtra.com/yavatmal/vidarbha/yavatmal/angry-bjp-agitates-against-congress-state-president-nana-patole-227199.html”]
“काळजी आणि शुभेच्छा…”करोना झाल्याचं कळताच पंतप्रधान मोदींनी फोन करत शरद पवारांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लवकरच कोरोनावर मात करुन आपल्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. असे ट्विट करत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजले.ते लवकरच कोरोनावर मात करुन आपल्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.#SharadPawar #GetWellSoon@AjitPawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/uIV5jEOLBS
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) January 24, 2022
‘आदरणीय शरद पवार साहेब यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत त्याला भेटलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी घेतली पाहिजे. त्यांच्या पुढील 7 दिवसांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती देत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.
Hon’ble Sharad Pawar Saheb has tested positive for Covid.
All those who have met him in the past few days must get themselves tested.
All his engagements for the next 7 days stand cancelled
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 24, 2022
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे ट्विट करत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
I pray to God for speedy recovery of NCP Chief Shri Sharad Pawar Saheb.
GET WELL SOON.@PawarSpeaks pic.twitter.com/OQNvp4N37u — Sunil Kedar (@SunilKedar1111) January 24, 2022
तर, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना लवकर बरे होण्यासाठी व्टिट करत सदभावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
Wishing you a speedy recovery.
Get well soon @PawarSpeaks ji https://t.co/NfbsIMiBZK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 24, 2022