झारखंड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत सक्तवसुली संचालनालय (ED)ला कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. कोणत्याही उद्योजक किंवा राजकीय नेत्याकडे हे घबाड सापडले नसून एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाकडील नोकराकडे हे कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. या कारवाईमध्ये मनी ल़ॉण्ड्रिंग आणि काळ्या पैशांचे प्रकरण असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. हे कोट्यवधीचे घबाड मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले आहे. याबाबात अधिक तपास ईडी करत आहे.
झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचा खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरांवर ईडीने कारवाई केली आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.
ईडीने नोकरांच्या घरांवर छापा मारला तेव्हा त्याच्या घरात छोट्या मोठ्या आकाराच्या 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. तपास अधिकाऱ्यांनी एक एक करून सर्व बॅगा घरातच रिकाम्या केल्या.
आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे चार वेळा आमदार झाले आहे. राज्य सरकारमध्ये त्यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी रांचीसह अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. दहा हजार रुपयांच्या लाच प्रकरणात ईडीचे पथक तपास करीत असताना त्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले त्याचे धागेदोरे ग्रामविकास मंत्री आलमीर आलम यांच्यापर्यंत पोहोचले. त्याच्या विभागातील भ्रष्टाचाराची माहिती ईडीच्या हाती लागली. हा काळा पैसा मंत्र्यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यांनी छापा टाकला असता त्यांच्या हाती कोट्यवधीच घबाड लागलं. ही रक्कम पाहून ईडीने आश्चर्यचकित झाले आहे.