USB Type-C ची कटकट अखेर संपणार! चीनच्या 50 कंपन्यांनी तयार केली ऑल इन वन 'सुपर केबल', युजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
आपण वेगवेगळ्या डिव्हाईससाठी वेगवेगळ्या केबलचा वापर करतो. कारण प्रत्येक डिव्हाईससाठी एक वेगळी केबल आधीपासूनच सेट करण्यात आली आहे. जसं की, टीवीसाठी एचडीएमआई केबल, फोन चार्जिंगसाठी USB Type C आणि इंटरनेटसाठी LAN केबल आपण वापरतो. मात्र आता असं करण्याची गरज नाही. कारण आता सर्व डिव्हाईससाठी तुम्ही एकाच केबलचा वापर करू शकणार आहात. कारण चीनमधील 50 कंपन्यांनी एक अनोखी अशी ऑल इन वन ‘सुपर केबल’ तयार केली आहे.
चीनमधील 50 कंपन्यांनी GPMI म्हणजेच General Purpose Media Interface नावाची एक नवीन टेक्नोलॉजी विकसित केली आहे. या टेक्नोलॉजीने जग बदललं आहे. खरं तर, GPMI एक ऑल इन वन केबल इंटरफेस आहे. जे केवळ व्हिडीओ, ऑडियोच नाही तर इंटरनेट डेटा आणि विज अशा चारही गोष्टींना एका केबलने पाठवू शकते. विशेष म्हणजेच ही केबल 50 हून अधिक चिनी कंपन्यांनी मिळून तयार केली आहे, ज्यामध्ये Hisense, Skyworth, TCL सारख्या मोठ्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. पण हे तंत्रज्ञान नक्की काय आहे, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
GPMI चा उद्देश सर्व डिव्हाईससाठी एकच केबल ऑफर करणं, म्हणजेच एक केबल फॉर ऑल बनायचं आहे. म्हणजेच आता प्रत्येक डिव्हाईससाठी वेगवेगळे केबल वापरण्याची गरज नाही. GPMI दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आले आहे, ज्यामधील एक आहे Type-C GPMI. हे व्हेरिअंट USB-C पोर्ट द्वारे काम करते आणि 96 Gbps स्पीड आणि 240W पॉवर सपोर्टसह येतो. दुसरा व्हेरिअंट Type-B GPMI एक खास कनेक्टरसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 192 Gbps ची स्पीड आणि 480W पर्यंत पावर सपोर्ट ऑफर केला जातो. ही स्पीड आणि पॉवर सध्याच्या USB आणि HDMI पेक्षा खूपच चांगली आहे.
GPMI चा सर्वात मोठा फायदा म्हणजेच ही केवळ एक केबल युजर्ससाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे. हेच कारण आहे की, भविष्यात याचा वापर HDMI, DisplayPort आणि Thunderbolt ऐवजी केला जाऊ शकतो. GPMI चे हे नवीन तंत्रज्ञान 8K व्हिडिओ सपोर्ट, मल्टी-डिव्हाइस कनेक्शन आणि हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर सारख्या गोष्टींमध्ये गेम चेंजर ठरू शकते. असेही म्हटले जात आहे की येत्या काळात हे तंत्रज्ञान जगभरात एक स्टँडर्ड निर्माण करू शकते.