काहीच दिवस शिल्लक! या दिवशी लाँच होणार Nothing Phone 3, 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याने असेल सुसज्ज
Nothing Phone 3 हा स्मार्टफोन जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. लाँचिंगपूर्वी या स्मार्टफोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. याशिवाय कंपनी देखील सोशल मीडियावर सतत या स्मार्टफोनचे टिझर शेअर करत आहे आणि फोनला प्रमोट करत आहे. कंपनीने अधिकृतपणे असं देखील सांगितलं आहे की, आगामी Nothing Phone 3 फोन Snapdragon 8s Gen 4 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. यामध्ये 5 वर्षांपर्यंत Android OS अपडेट्स दिले जाणार आहेत.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या लेटेस्ट टिझरमध्ये Phone 3 च्या रियर कॅमेरा यूनिटची झलक दाखवण्यात आली आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट असण्याची शक्यता आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी सर्वचजण उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये Nothing ने खुलासा केला आहे की, Phone 3 मध्ये मागील बाजूला 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला जाणार आहे. पोस्टमध्ये नवीन टेलीफोटो सेंसर दाखवणारी एक ईमेज आहे. या प्रतिमेत मागील कॅमेरा डिझाइन देखील थोडेसे दृश्यमान आहे, ज्यामध्ये विजिबल स्क्रू आणि शार्प लाइन्स आहेत.
Phone (3) with 50 MP periscope lens.
Built for creators. pic.twitter.com/GAIuMLANUb
— Nothing India (@nothingindia) June 26, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सेंसर 3x ऑप्टिकल झूम ऑफर करणार आहे. याआधी व्हायरल होत असलेल्या पोस्टने Phone 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट असण्याची शक्यता वर्तवली होती. नवीन पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर व्यतिरिक्त, कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य सेन्सर आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर असल्याचे देखील सांगितलं जात आहे. फोन 2 च्या ड्युअल-कॅमेरा सेटअपपेक्षा हे एक मोठे अपग्रेड असेल. हा कॅमेरा सेटअप नथिंग फोन 3a प्रो च्या कॅमेरा युनिटशी जुळतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, पेरिस्कोप सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आहे.
मागील लिक्सनुसार, Nothing Phone 3 मध्ये 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये 6.7-इंच LTPO OLED स्क्रीन 1.5K रेजोल्यूशन आणि 5150mAh बॅटरी 100W वायर्ड चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता आहे. फोन वायरलेस आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. Nothing ने पुष्टि केली आहे की, Phone 3 मध्ये Snapdragon 8s Gen 4 चिपसेट असणार आहे. आगामी फोनमध्ये 5 वर्षांचे Android OS अपडेट्स आणि 7 वर्षांचे सुरक्षा पॅच असतील. हे 1 जुलै रोजी Nothing Headphone 1 सोबत लाँच होईल.