काय सांगता! चालत राहा आणि तुमचा मोबाईल होईल चार्ज! 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने तयार केली 'अनोखी बूट', नक्की काय आहे टेक्नोलॉजी?
आपण रोज हजारो पाऊलं चालतो. कधी ऑफीसला जाण्यासाठी तर कधी पार्कमध्ये जाण्यासाठी, कधी बाजारात जाण्यासाठी तर कधी दुकानात जाण्यासाठी. चालण्याने आपलं आरोग्य उत्तम राहतं असं म्हटलं जातं. चालण्याचे अनेक फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील. पण चालण्याने मोबाईल चार्ज होतो, असं कधी ऐकलं आहे का? होय, एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने एक असं तंत्रज्ञान तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने आपण मोबाईल चार्ज करू शकतो. यासाठी आपल्याला फक्त चालावं लागणार आहे.
केवळ चालण्याने आपला मोबाईल चार्ज होणार आहे. ही अनोखी टेक्नोलॉजी प्रत्येक मोबाईल युजरसाठी फायद्याची ठरणार आहे. ज्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती, अनेक लोकं केवळ ज्याचा विचार करत होते, अशी टेक्नोलॉजी आता अखेर तयार करण्यात आली आहे. एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने ही टेक्नोलॉजी तयार केली आहे. आता केवळ चालण्याने मोबाईल चार्ज होणार आहे. खरं तर फिलीपींसच्या एंजेलो कसिमिरोने अशी बूट तयार केली आहेत, जी पायात घालून चालल्याने वीज निर्मिती केली जाणार आहे. या वीजेच्या मदतीने तुम्ही मोबाइल, टॉर्चसारखे काही छोटे – छोटे डिव्हाईस चार्ज करू शकणार आहात. एंजेलोच्या या इनोवेशनने टेक्नोलॉजी एका अनोख्या पातळीवर पोहोचली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
15 वर्षीय विद्यार्थ्याने या बूटांमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, त्याला पाइजोइलेक्ट्रिसिटी (Piezoelectricity) असं म्हटलं जाते. हे एक वैज्ञानिक तत्व आहे ज्यामध्ये एका विशेष प्रकारच्या क्रिस्टल किंवा सिरेमिक पदार्थावर दाब देऊन वीज निर्माण केली जाते. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या पायांनी निर्माण केलेला दाब या पदार्थांवर पडतो आणि वीज निर्माण होते. या विजेच्या मदतीने छोटे छोटे डिव्हाईस अगदी सहज चार्ज केले जाऊ शकतात.
एंजेलोने त्याच्या बूटांच्या टांचाकडील भागात डबल पाइजोइलेक्ट्रिक एलिमेंट फिट केले आहे, जिथे सर्वात जास्त जोर दिला जातो. हा घटक प्रत्येक पावलावर वीज निर्माण करत राहतो जो एका लहान पॉवर बँकमध्ये साठवला जातो. यानंतर या स्टोअर करण्यात आलेल्या विजेचा वापर आपण मोबाइल किंवा टॉर्च किंवा माइक्रो कंट्रोलरसारखे डिव्हाईस चार्ज करण्यासाठी करू शकतो. या तंत्रज्ञानाचा भविष्यात फार मोठा फायदा होऊ शकतो.
चाचणीदरम्यान असं आढळलं आहे की, हे शूज सुमारे 8 तासांत 400mAh बॅटरी चार्ज करू शकतात. याचा वापर काही काळ आपत्कालीन दिवे किंवा फोन चालू करण्यासाठी केला जाऊ शकतो. अजूनही असे काही भाग आहेत, जिथे विजेच्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा ठिकाणी हे शूज अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत. हे शूज जाणूनबुजून अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते कोणत्याही प्रकारचा आवाज करत नाहीत किंवा ते खूप जड नाहीत. त्यांची रचना अगदी सामान्य शूजसारखीच ठेवण्यात आली आहे.