Tech Tips: किती वर्षांनी बदलावा WiFi Router? उशीर केल्यास इंटरनेट स्पीडवर होतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर
Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच
अनेकदा असं होतं की, तुम्ही वायफाय इंटरनेटचा चांगला प्लॅन खरेदी केला असेल मात्र तरी देखील इंटरनेटची स्पीड स्लो झाली असेल, तर यामागे एक मोठं कारण असू शकतं. जर तुमचा वायफाय राऊटर जास्त जुना झाला असेल तर इंटरनेट स्पीड स्लो होऊ शकते. सहसा वायफाय राऊटरचे आयुष्य 3 ते 5 वर्षांचे असते. यानंतर तुमच्या वायफाय इंटरनेटची स्पीड स्लो होते. वायफाय राऊटर बदलण्याची योग्य वेळ म्हणजे राऊटर खरेदी केल्यानंतर 4 ते 5 वर्षांचा कालावधी. (फोटो सौजन्य – Pinterest)
काळानुसार वायफाय राऊटरच्या हार्डवेअरवर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय, जुने वायफाय राऊटर नव्या तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करत नाही. जसे वायफाय 5 किंवा वायफाय 6. जर तुम्ही जास्त डिव्हाईस कनेक्ट केले असतील तर तुमच्या जुन्या वायफाय राऊटरची क्षमता कमी होते आणि इंटरनेट स्लो होते. याशिवाय डिव्हाईस गरम होऊ लागते आणि त्याच्या परफॉर्मंसवर देखील परिणाम होतो.
जर तुम्हाला असं वाटत असेल की इंटरनेटची स्पीड वारंवार कमी होत आहे आणि व्हिडीओ बफरिंग जास्त होत आहे किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये सिग्नल पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत, याचा अर्थ तुमता वायफाय राऊटर बदलण्याची वेळ आली आहे. तसेच जर वायफाय राऊटर वारंवार रिस्टार्ट करावा लागत असेल तर हे संकेत आहेत की आता तुम्हाला तुमच्या घरातील वायफाय राऊटर बदलावा लागणार आहे.
नवीन राऊटर खरेदी करताना तुम्हाला लेटेस्ट टेक्नोलॉजीवर लक्ष द्यावे लागणार आहे. WiFi 5 किंवा WiFi 6 सपोर्ट असणारे राऊटर अधिक चांगली स्पीड आणि कवरेज ऑफर करतात. ड्यूल-बँड किंवा ट्राई-बँड राउटर जास्त डिव्हाईस कनेक्टिव्हिटी संभाळण्यासाठी सक्षम असतात. तसेच तुम्हाला तुमच्या घराच्या हिशोबाने आणि वापरानुसार वायफाय राऊटर खरेदी करावे लागणार आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.






