Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रॉसहेअर प्लेसमेंट. नेहमी तुमचा निशाणा तुमच्या शत्रूच्या थेट डोक्यावर लागेल यासाठी प्रयत्न करा. असे अनेक प्लेअर्स असतात जे जमिनी वरून निशाणा साधत शत्रूला मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हेडशॉट लागण्याची शक्यता अत्यंत कमी होते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शत्रूला हेडशॉट मारून नॉकआऊट करायचे असेल तर आधीपासूनच तुमचा निशाणा तुमच्या शत्रूच्या डोक्यावर असला पाहिजे. हेडशॉट मारण्यासाठी योग्य शस्त्राची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. AK, M1014, MP40 आणि Desert Eagle सारख्या बंदुकींच्या मदतीने हेडशॉट मारणे अत्यंत सोपे होते. विशेषतः डेजर्ट ईगलची निवड करून तुम्ही अगदी सहज हेडशॉट मारून शत्रूला नॉकआउट करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
याशिवाय हेडशॉट मारण्यासाठी ड्रॅग हेडशॉट टेक्नीक देखील अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये गोळी झाडताना तुम्हाला स्क्रीन थोडी वरच्या बाजूला ड्रॅग करावी लागते. ज्यामुळे गोळी थेट शत्रूच्या डोक्यावर जाऊन लागते. ही टेक्नीक शिकण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे अत्यंत गरजेचे आहे. ट्रेनिंग ग्राउंडमध्ये जाऊन तुम्ही दररोज निशाणा साधन्याची, शूटिंग करण्याची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, शत्रूच्या डोक्यावर निशाणा साधणं तितकंच तुमच्यासाठी सोपं होणार आहे. यासोबतच कस्टम HUD बटन तुमच्या सोयीनुसार सेट करा ज्यामुळे तुमचा गेमप्ले अधिक स्मूथ होईल.
फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध






