POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत... 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा
गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या
पोको एक्स 8 प्रो या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे आयरॉन मॅन एडीशन देखील लाँच केले आहे. ज्याची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, वनप्लस नॉर्ड 5 स्मार्टफोनचे बेस व्हेरिअंट 31,999 रुपये आहे. तर 12GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पोको एक्स 8 प्रो मध्ये फ्लॅट कडांसह क्लीन डिझाईन देण्यात आली आहे. मागील बाजूला पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये IP66, IP68 आणि IP69K रेटिंग दिली आहे, ज्यामुळे स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये प्रिमियम डिझाईनसह IP65 रेटिंग दिली आहे. पोको स्मार्टफोनच्या तुलनेत ही रेटिंग कमी आहे.
पोको एक्स 8 प्रो मध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.5K रेजॉल्यूशन, HDR10+ सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस 3500 निट्सपर्यंत आहे. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 6.8-इंच मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 1.5K रेजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट दिला आहे. याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत मर्यादित आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसर देण्यात आला आहे. पोको एक्स 8 प्रो मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा AnTuTu बेंचमार्कवर 20 लाखहून अधिक स्कोअर करतो. फोनमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 3D आइसलूप कूलिंग सिस्टम आणि 5300mm² वेपर चेंबर दिले आहे. दुसऱ्या बाजूला वनप्लस नॉर्ड 5 मध्ये स्नैपड्रैगन 8s जनरेशन 3 प्रोसेसर दिला आहे, जो फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मेंससाठी ओळखला जातो. या डिव्हाईसमध्ये देखील एलपीडीडीआर5एक्स रॅम दिले आहे. स्टोरेज UFS 3.1 आहे. यामध्ये 7300mm² मोठा वेपर चेंबर दिला आहे. वनप्लसने दावा केला आहे की,नॉर्ड 5 बीजीएमआय, सीओडी मोबाईल आणि फ्री फायर मॅक्स सारख्या गेम्ससाठी 144FPS पर्यंत सपोर्ट देतो.
पोको एक्स 8 प्रोमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 80W चार्जिंग सपोर्टसह 6800mAh बॅटरी दिली आहे.
दोन्ही स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप जवळपास सारखाच आहे. पोको एक्स 8 प्रोमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 50MP प्राइमरी आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी अधिक चांगला मानला जातो.
पोको एक्स 8 प्रो अँड्रॉईड 16 बेस्ड हाइपरओएस 3.0 सह येतो. कंपनी 4 वर्षांसाठी ओएस अपडेट्स आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन देते.वनप्लस नॉर्ड 5 Android 15 आधारित ऑक्सीजनओएस15 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 OS अपडेट आणि 6 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे.पोको एक्स8 प्रो एका अँड्रॉइड व्हर्जनने पुढे आहे.






