Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता भारतातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत देखील वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 11:10 AM
Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मोबाईल टॉवर्स चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
  • 5G नेटवर्क विस्तार आणि महागड्या उपकरणांमुळे टेलिकॉम कंपन्यांचा ऑपरेशन खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  • वाढत्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महाग करू शकतात.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यामुळे सामान्य लोकांची चिंता वाढली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 107 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे. रोजच्या जीवनातील खर्चांमुळे लोकांच्या खिशावर आधीच ताण पडत आहे. अशातच सतत महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे महिन्याते बजेट कोलमडत आहे. अशातच आता पुन्हा एकदा एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती देखील वाढू शकतात. पेट्रोल – डिझेल सारख्या इंधनांच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम टेलिकॉम कंपन्यांच्या खर्चावर पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम मोबाईल यूजर्सवर होऊ शकतो.

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

टॉवर्स ऑपरेट करण्याचा खर्च

खरं तर, मोबाईल नेटवर्क सुरु ठेवण्यासाठी हजारो टॉवर्स सतत काम करत असतात. हे टॉवर्स सुरु ठेवण्यासाठी विज आणि डिझेलचे सर्वात मोठे योगदान असते. रिपोर्टनुसार, कोणत्याही मोबाईल टॉवरच्या एकूण ऑपरेटिंग खर्चाच्या सुमारे 40 टक्के भाग केवळ विज आणि इंधनासाठी खर्च होतो. अशा परिस्थितीत जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतात, अशावेळी टॉवर्स ऑपरेट करण्याचा खर्च देखील अतिशय वेगाने वाढतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

केवळ डिझेलसाठी शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च

टेलिकॉम कंपन्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान असे आहे की, त्यांना देशभरात पसरलेले नेटवर्क कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु ठेवावे लागतात. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागांमधील, अनेक टॉवर्स आज देखील डिझेल जनरेटरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत इंधनाच्या किंमती वाढल्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या खिशावर होणार आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना दरवर्षी केवळ डिझेलसाठी शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येऊ शकतो.

5G नेटवर्कचा विस्तार

तसेच, ही परिस्थिती आणखी गंभीर होण्यामागील दुसरं कारण म्हणजे देशात वेगाने होणारा 5G नेटवर्कचा विस्तार. देशभरात उभारण्यात आलेले 5G टॉवर्स जुन्या नेटवर्कच्या तुलनेत जास्त विजेचा वापर करतात. या टॉवर्सना सतत हाय पावर सपोर्टची गरज असते. याचा अर्थ असा आहे की, येणाऱ्या काळात कंपन्यांचा ऑपरेशन खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

टॅरिफ वाढवण्याची योजना

याशिवाय, जागतिक पुरवठा साखळीतील सततच्या समस्यांमुळे टेलीकॉम सेक्टरमधील अडचणी वाढणार आहेत. नेटवर्क उपकरण, बॅटरी आणि दुसरे आवश्यक हार्डवेयरचा खर्च आधीपासूनच वाढला आहे. कंपन्या गेल्या बऱ्याच काळापासून टॅरिफच्या किंमती वाढवण्याची योजना आखत आहेत. आता असे मानले जात आहे की, कंपन्या हा निर्णय लवकरच घेऊ शकतात. जर कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या तर यूजर्सना कॉलिंग आणि डेटा प्लॅनसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता याचा परिणाम रिचार्ज प्लॅनच्या किंमतीवर देखील होण्याची शक्यता आहे.

Web Title: After petrol diesel telecom companies may also increase recharge plan prices what will be the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • telecom company

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान
1

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर
2

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर
3

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना झाली गडबड? चिंता करू नका… अशी दुरुस्त करा तुमची चूक
4

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना झाली गडबड? चिंता करू नका… अशी दुरुस्त करा तुमची चूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.