
लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा
Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा
AI+ चा सर्वात अफोर्डेबल फोल्डेबल स्मार्टफोन 2026 च्या पहिल्या तिमाहित लाँच केला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या वर्षात कंपनीच्या आणखी काही योजना देखील आहेत. त्यामुळे 2026 मध्ये भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक मोठे धमाके होणार आहेत. कंपनीच्या अपकमिंग स्मार्टफोनच्या यादीमध्ये Nova Pro, Nova Ultra आणि Nova Flip स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने फोल्डेबल फोनचा टिझर Nova Flip या नावाने शेअर केला आहे. त्यामुळे आगामी स्मार्टफोन देखील याच नावाने लाँच केला जाणार याती काही शंकाच नाही. (फोटो सौजन्य – X)
Flip the script with #NovaFlip. Stay tuned. Reshare to experience the product!#AiPlusSmartphone #NxtQuantumOS #ComingSoon #NovaFlip #FliptheFuture pic.twitter.com/fL5AYlX6uw — Ai+ Smartphone (@aiplus_official) December 16, 2025
आगामी अफोर्डेबल फोल्डेबल स्मार्टफोन अँड्रॉईडवर आधारित कंपनीच्या स्पेशल ऑपरेटिंग सिस्टम NxtQuantum OS वर आधारित आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे सॉफ्टवेअर कंपनीने खास फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी तयार केले आहे. याच्या मदतीने यूजर्स अनेक अॅप्स आणि फीचर्स डिव्हाईस फोल्ड असल्यानंतर देखील वापरू शकणार आहेत. त्यामुळे आगामी स्मार्टफोन यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे.
AI+ Nova Flip च्या टिझरमध्ये या फोनच्या बॅक पॅनलची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये स्लीक फोल्डेबल हिंज आणि साइड-माउंटेड पावर बटन देण्यात आले आहे. कंपनीने या फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देखील दिवा आहे. या स्मार्टफोनचे डिझाईन काही प्रमाणात Oppo Find N सीरीज सारखे आहे. नोवा फ्लिप स्मार्टफोनमध्ये कंपनीने नोटिफिकेशन आणि क्विक विजेट्ससाठी छोटी कव्हर स्क्रीन देखील दिला आहे. यासोबतच फोनच्या प्रायमरी फोल्डेबल डिस्प्लेमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट मिळणार आहे. टिझर ईमेजवरून फोनच्या डिझाईनबाबत माहिती मिळत आहे. स्मार्टफोनचे बरेच स्पेसिफिकेशन्स अद्याप अधिकृतपणे जाहिर करण्यात आले नाही.
AI+ त्यांचा आगामी स्मार्टफोन Nova Flip अफोर्डेबल किंमतीत लाँच करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे Nova Flip स्मार्टफोन 40,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: ज्याची स्क्रीन दुमडता (fold) येते असा स्मार्टफोन म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन. तो उघडल्यावर टॅब्लेटसारखा मोठा डिस्प्ले देतो.
Ans: मोठा डिस्प्ले, मल्टीटास्किंग सोपे, प्रीमियम डिझाइन आणि पोर्टेबल फॉर्म-फॅक्टर हे प्रमुख फायदे आहेत.
Ans: सुरुवातीला तसे होते, पण आता नवीन हिंग टेक्नॉलॉजी आणि मजबूत डिस्प्ले मुळे फोल्डेबल फोन अधिक टिकाऊ झाले आहेत.