Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा
सोशल मीडिया कंपनीचं अस म्हणणं आहे की, कमी आणि टारगेटेड हॅशटॅगचा वापर केल्यास क्रिएटर्सना कंटेंट डिस्कवरी आणि परफॉर्मंसमध्ये अधिक मदत होणार आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे जेनेरिक आणि अनेक हॅशटॅग्ससह पोस्ट स्पॅम होण्याची संख्या देखील कमी होणार आहे. कंपनीने घेतलेल्य या निर्णयाचा उद्देश फंक्शनॅलिटीचा चुकीचा वापर रोखणं असा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामवर दिर्घकाळापासून हॅशटॅगचा वापर केला जात आहे. हॅशटॅग यूजर्सना कंटेट डिस्कव्हरीमध्ये मदत करतात असा दावा केला जाता. टेक दिग्गजांच असं म्हणणं आहे की, हॅशटॅग्स फंक्शनॅलिटी पोस्टला टॉपिक-बेस्ड सर्च, ट्रेंडिंग लिस्ट आणि एल्गोरिदम-ड्रिवन रिकमेंडेशनमध्ये वारंवार दाखवते. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने यापूर्वी यूजर्सना एका पोस्टमध्ये 30 हॅशटॅग्सचा वापर करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता असं होणार नाही. कंपनीने आता एक घोषणा केली आहे, ज्यामुळे हॅशटॅग्सच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे.
कंपनीने घोषणा केली आहे की, क्रिएटर्स अकाऊंटमध्ये आता एक रील किंवा पोस्टमध्ये जास्तीत जास्त 5 हॅशटॅग्सचा वापर केला जाऊ शकतो. सोशल मीडिया दिग्गजने सांगितलं आहे की, ‘आम्हाला असे आढळून आले आहे की अनेक सामान्य हॅशटॅगऐवजी कमी (5 पर्यंत) अधिक टारगेटेड हॅशटॅग वापरल्याने तुमच्या कंटेंटचे परफॉर्मंस आणि इंस्टाग्रामवरील लोकांचा अनुभव दोन्ही सुधारू शकतात.’
कंपनीची अशी इच्छा आहे की, क्रिएटर्स पोस्ट आणि रिल्सवर वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅग्सच्या बाबतीत अधिक योग्य प्रकारे आणि विचार करून काम करतील. याशिवाय वापरले जाणारे हॅशटॅग कंटेट संबंधित आहेत की नाही यावर देखील लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. उदाहरण देत इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, ब्यूटी क्रिएटर्स ब्यूटी संबंधित हॅशटॅग्सचा वापर करून ब्यूटी कंटेंटमध्ये आवड असणाऱ्या यूजर्सना आकर्षित करू शकतात. #reels किंवा #explore सारखे सामान्य हॅशटॅग, जे सामान्यतः क्रिएटर्स वापरतात, एक्सप्लोर फीडमध्ये आणि इतरत्र असा कंटेट दिसतो तेव्हा खरोखर मदत करत नाहीत. याऊलट या हॅशटॅगमुळे कंटेटचा परफॉर्मंस अधिक खराब होऊ शकतो. गेल्या महिन्यात हॅशटॅगबाबत काही दावे देखील केले जात होते. मात्र आता कंपनीने घोषणा केली आहे, यूजर्स 5 हॅशटॅग्सचा वापर करू शकतात.
Ans: स्पॅम कंटेंट कमी करण्यासाठी आणि दर्जेदार पोस्टला जास्त reach मिळावा यासाठी Instagram ने हॅशटॅग्सच्या वापरावर मर्यादा आणली आहे
Ans: Instagram आता मर्यादित आणि relevant हॅशटॅग्स वापरण्याचा सल्ला देत आहे. जास्त हॅशटॅग वापरल्यास पोस्टचा reach कमी होऊ शकतो.
Ans: पोस्ट spam म्हणून ओळखली जाऊ शकते, reach घटू शकतो किंवा algorithm पोस्टला कमी प्राधान्य देऊ शकतो.






