19 मिनिटे...40 मिनिटे... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video
Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, कोणताही व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्की तपासा. डीपफेक व्हिडिओमुळे फसवणूक, बदनामी आणि सायबर क्राईम सारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करताना सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. AI डीपफेक व्हिडिओ नक्की कसे ओळखावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही अगदी काही सोप्या पद्धतीने डीपफेक व्हिडिओ ओळखू शकता. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
डिपफेक व्हिडीओमध्ये चेहऱ्याची हालचाल नैसर्गिक दिसत नाही. तसेच डोळे आणि आवाज देखील संबंधित व्यक्तिसोबत जुळत नाहीत. डोळ्यांची अतिशय विचित्र हालचाल सुरु असते.
सहसा फेक व्हिडीओमध्ये चेहऱ्याच्या कडा अस्पष्ट दिसतात. व्यक्तिचा चेहरा आणि मान/केस यामध्ये हलका फरक जाणवतो. तसेच चेहऱ्याची रुपरेषा एकसारखी नसते.
डिपफेक व्हिडीओमध्ये व्यक्तिचा खोटा आवाज वापरला जातो. हा आवाज रोबोटिक किंवा फ्लॅट वाटतो. तसेच व्यक्तिच्या भावना आणि बोलणं जुळत नाही.
तुम्ही एखादा असा व्हिडीओ बघत असाल ज्यामध्ये चेहरा HD पण पार्श्वभूमी ब्लर असेल, तर तो फेक व्हिडीओ असण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही फ्रेम्समध्ये व्यक्तिचा चेहरा विचित्र दिसतो.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या डोळे आणि भुवयांकडे बारकारने लक्ष द्या. जर तुम्हाला डोळ्यांची दिशा नैसर्गिक वाटत नसेल आणि भुवया विचित्र दिसत असतील, तर तो फेक व्हिडीओ असू शकतो.
व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड झालेले किंवा अनोळखी इंस्टाग्राम पेजवरून आलेले व्हिडीओ ओपन करणं टाळा. व्हिडीओ खरा आहे की खोटा हे तपासण्यासाठी अधिकृत न्यूज साईट किंवा व्हेरिफाईड अकाऊंटचा वापर करा.
गुगल रिव्हर्स इमेज / इनव्हीआयडी टूलचा वापर करून देखील व्हिडीओची सत्यता तपासली जाऊ शकते. राजकीय किंवा सेलेब्रिटी संबंधित व्हिडिओ बहुतेक वेळा डीपफेक असतात.
Ans: AI (Artificial Intelligence) च्या मदतीने बनवलेला बनावट व्हिडिओ म्हणजे Deepfake Video. यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा हावभाव खोट्या पद्धतीने बदलले जातात.
Ans: अनेक वेळा नाही. व्हायरल होणारे बरेच व्हिडिओ AI द्वारे बनवलेले Deepfake असतात, जे खरे वाटतात पण प्रत्यक्षात बनावट असतात.
Ans: ओठांची हालचाल आणि आवाज जुळत नाही, चेहऱ्याभोवती ब्लर दिसतो, डोळ्यांची हालचाल नैसर्गिक वाटत नाही किंवा व्हिडिओ फारच “परफेक्ट” वाटतो – हे Deepfake चे संकेत असू शकतात






