Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे उद्घाटन करण्यात आलं. दिल्लीतील प्रगती मैदान येथील इंडिया पॅव्हेलियन येथे इंडिया मोबाईल काँग्रेस ईव्हेंटचे आयोजन करण्यात आलं आहे.15 ऑक्टोबरपासून या ईव्हेंटला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. या ईव्हेंटला दिग्गज नेते आणि उद्योगपतींनी हजेरी लावली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 16, 2024 | 08:23 AM
अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप

अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप

Follow Us
Close
Follow Us:

इंडिया मोबाइल काँग्रेसच्या 8 व्या आवृत्तीला मंगळवारी सुरुवात झाली आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत हा इव्हेंट सुरू राहणार आहे. जवळपास सर्वच आघाडीच्या कंपन्या मोबाईल काँग्रेस इव्हेंटमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डिव्हाईस लाँच करत आहेत. रिलायन्स जिओने ॲडॉप्टिव्ह लर्निंग सोल्यूशनसाठी AI आणले आहे. AI सोल्यूशन्सच्या मदतीने, अभ्यासक्रम किंवा इतर कोणतेही पुस्तक वाचताना, त्यातील कठीण शब्द आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होणार आहे.

हेदेखील वाचा- Upcoming Smartphones in 2024: Redmi पासून Realme पर्यंत या कंपन्या लाँच करणार बजेट फ्रेंडली स्मार्टफोन

प्रश्न काही क्षणात सुटतील

अभ्यास करताना किंवा कोणतेही पुस्तक वाचताना तुम्हाला काही अडलं किंवा एखादा शब्द कठीण वाटला तर यामध्ये AI तुमची मदत करणार आहे. तुम्हाला जो शब्द किंवा जो प्रश्न कठीण वाटतो त्या पानाचा फोटो घ्यावा लागेल आणि तो Imbibe ॲपवर टाकावा लागेल ज्यामध्ये AI सोल्यूशन आहे. अ‍ॅपमध्ये फोटो अ‍ॅड करताच, त्या पानावर दिलले सर्व कठीण शब्द खाली दिसू लागतील. या शब्दावर क्लिक करून, AI च्या मदतीने त्याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – pinterest)

या ॲपमध्ये NCERT पासून इतर उपयुक्त पुस्तकांपर्यंत सर्व पुस्तकांशी संबंधित 53,000 व्हिडिओ आहेत. म्हणजेच या प्रकारच्या ॲपद्वारे भविष्यात ट्यूशन घेण्याची गरज भासणार नाही. Ericson ने असा AI आधारित चष्मा विकसित केला आहे जो व्हिडीओ कॉल दरम्यान दोन्ही व्यक्तींनी म्हणजे स्पीकर आणि ऐकणाऱ्याने घातला तर त्यांना असे वाटेल की ती व्यक्ती मोबाईल फोनवर नाही तर समोर बोलत आहे.

AI सर्वकाही सांगेल

गावात बसलेली एखादी व्यक्ती शहरातील शिक्षकाकडून काही शिकत असेल किंवा हा चष्मा घालून डॉक्टरांशी बोलत असेल, तर त्याला समोर शिक्षक किंवा डॉक्टर बसल्यासारखे वाटेल. त्याला ऑगमेंटेशन ऑफ रिॲलिटी असे नाव देण्यात आले आहे. जर एखाद्या वयस्कर किंवा अशिक्षित व्यक्तीने हे चष्मे घालून एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचे आहे किंवा बस स्टँडवर जाऊन सांगितले की, विशिष्ट ठिकाणी बस पकडायची आहे, तर हे चष्मे त्याला रस्ता देखील दाखवतील आणि ती बस आल्यावर त्याला सूचना दिली जाईल.

हेदेखील वाचा- Vivo X200 सीरीजमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन्स, सोनी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज

तुम्ही घरी बसून स्टेडियमचा आनंद घ्याल

त्याचप्रमाणे, चष्म्याच्या आणखी एका जोडीच्या मदतीने, स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान तुम्हाला मागची सीट मिळाली तरी तुम्ही मैदानावरच सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. जिओ आता ‘हर घर टीवी बनेगा कॉम्प्युटर’ नावाची सेवा लाँच करत आहे. यामध्ये Jio Cinema, Jio TV प्रमाणेच TV मध्ये एक फीचर देण्यात आले आहे आणि त्यावर क्लिक केल्यावर टिव्ही एक कॉम्प्युटर बनेल जो क्लाउडशी कनेक्ट होईल. कीवर्ड आणि माउसच्या मदतीने तुम्ही टीव्हीचा संगणक म्हणून वापर करू शकाल. हे फीचर लवकरच सर्वांसाठी लाँच केले जाईल.

एरिक्सनने AI ने सुसज्ज रॉकी नावाचा रोबोटिक कुत्रा देखील लाँच केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सध्या हा कुत्रा कारखाने, खाणी आणि बंदरांमध्ये काम करेल जेथे आग, पूर किंवा इतर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास इशारा देईल. नंतर ते घरांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

Web Title: Ai robot will change whole world from study to sports it will interfere in every work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 08:23 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.