Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

DELL टेक्नॉलॉजीच्या उपक्रमातून देशातील २३ हजार तरुणांना प्रशिक्षण देत भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती दिली जाणार आहे. हा उपक्रम DELL इंडिया एआय ब्लूप्रिंटवर आधारित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2026 | 02:36 PM
23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

23 हजार तरुणांसाठी मोठी संधी! DELL चा ‘उडान’ उपक्रम, AIपासून रोजगारापर्यंत मिळणार प्रशिक्षण

Follow Us
Follow Us:
  • ‘उडान’ उपक्रमातून 23 हजार तरुणांना AI, क्लाउड आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • दिल्ली-NCR, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे या शहरांतील 100 ITI आणि 90 उच्च शिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
  • पहिल्याच वर्षात 25 डीप-टेक स्टार्टअप्स आणि 10 सूक्ष्म उद्योग उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
DELL टेक्नॉलॉजीने ‘उडान: भारताचे भविष्यातील कार्यालयीन स्थळ’ या नव्या राष्ट्रीय कौशल्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज घोषणा केली. हा कार्यक्रम एफआयटीटी-आयआयटी दिल्ली, लर्निंग लिंक्स फाऊंडेशन आणि जनरेशन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाईल. या उपक्रमातून देशातील २३ हजार तरुणांना प्रशिक्षण देत भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती दिली जाईल.

Krishna Janmashtami 2026: सजायला वेळ नाही? नो टेंशन, Gemini AI च्या मदतीने घरबसल्या तयार करा राधाराणीसारखा फोटो

या प्रशिक्षणात AI, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन या क्षेत्रांशी निगडीत प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. तसेच उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करता येतील. प्रशिक्षणाच्या आयोजनातून तरुणांना या क्षेत्रातील कंपन्यांनी जुळवून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यांना शिकाऊ उमेदवारी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग उपलब्ध होतील.  

या शहरांत होणार उपक्रमाचे आयोजन

हा उपक्रम DELL इंडिया एआय ब्लूप्रिंटवर आधारित आहे. दिल्ली एनसीआर, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले जाईल. यासाठी १०० आयटीआय आणि ९० उच्च शिक्षण संस्थांची निवड केली आहे. एफआयटीटी-आयआयटी दिल्लीकडून चार वेगवेगळ्या विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाईल. हे चार अभ्यासक्रम AI एप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाउड डेव्हलपमेंट, असेंबली लाईन ऑपरेशन्स आणि फील्ड तंत्रज्ञ या क्षेत्रांशी निगडीत आहे. या अभ्यासक्रमाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तब्बल ४० हून अधिक नामांकित कंपन्यांनी मान्यता दिली आहे.

लर्निंग लिंक्स फाऊंडेशन संस्था

तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि हायपरस्केलर्स या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांनी या विशेष अभ्यासक्रमाला पसंती दर्शवली आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष गरजांबाबत माहिती दिली जाईल. लर्निंग लिंक्स फाऊंडेशन ही संस्था उच्च शिक्षण संस्थआंमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करेल. जनरेशन इंडिया फाऊंडेशन आयटीआयमधील अंमलबजावणी आणि रोजगाराच्या संधींची जबाबदारी सांभाळेल.

मनिष गुप्ता काय म्हणाले?

तरुणांना रोजगार देणा-या नव्या उपक्रमाबद्दल DELL टेक्नॉलॉजीज इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनिष गुप्ता यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “भारतात AI क्षेत्रात वेगाने नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या नोकऱ्यांसाठी नवीन कौशल्यांची आवश्यकता असते. या क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांची बरीच कमतरता आहे. ‘उडान’ या उपक्रमाद्वारे DELL ही तफावत दूर करेल. या उपक्रमातून शिक्षण ते रोजगारापर्यंतचा प्रवास सुलभ होण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबवल्या जातील. हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबवला जाईल. याकरिता लाखो तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्थांसोबत भागीदारी केली जात आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. यात कौशल्यविकासाची भूमिका फार महत्त्वाची आहे. योग्य प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास रोजगारक्षम तरुण तयार होतील. हा तरुणवर्ग उद्योगातील बदलत्या गरजांसाठी तयार असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल. नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या विकासालाही मदत होईल. यामुळे देशाच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीलाही बळ मिळेल. मानवी प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, हा आमचा उद्देश आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी डेल वचनबद्ध आहे.“

‘उडान’ हा उपक्रम ‘स्किल इंडिया २.०’, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या योजनांशी सुसंगत आहे. या उपक्रमातील अभ्यासक्रमातील रचनेनुसार, राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिका-यांना पहिल्या वर्षापासूनच सहभागी करुन घेतले जाईल. या मॉडेलचे संपूर्ण दस्तावेजीकरण केले जाईल. उद्योग क्षेत्रातील मागणी, शैक्षणिक संस्थांची क्षमता आणि भविष्यासाठी सुसज्ज तरुण पिढी यांची सांगड घालून त्यांना शाश्वत आर्थिक संधींशी जोडणे, हे ‘उडान’ या उपक्रमाच्या आयोजनामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

या उपक्रमातून नवउद्योजकतेला प्राधान्य देण्यात आले आहे. एफआयटीटी-आयआयटी दिल्लीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रशिक्षण शिबीरे तसेच तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून या उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या वर्षातच उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमधील २५ डीप-टेक स्टार्टअप्स विकसित केले जातील. आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून १० सूक्ष्म उद्योगांची उभारणी केली जाईल. DELL या सर्व नवउद्योजकांना भांडवल आणि बिझनेस नेटवर्कशी जोडून देईल. डेलचे कर्मचारी सर्व विद्यार्थ्यांना २ हजार तासांहून अधिक काळ मार्गदर्शन करतील. हे तज्ज्ञ पाचही उद्योग क्षेत्रांत आपला जम बसवणा-या तरुणांना करिअर, AI आणि मुलाखतींचे धडे देतील.

अनेकदा कौशल्य विकास उपक्रमाचे आयोजन करणा-या इतर संस्थां प्रशिक्षण काळ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंद ठेवण्यापुरत्या मर्यादित राहणे पसंत करतात. याउलट, ‘उडान’ हा उपक्रम तरुणांचे जीवनमान उंचावण्यावर तसेच त्यांच्या रोगगार निर्मितीवर भर देतो. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी तरुणांना नोकरी मिळाल्यानंतरही रोजगार तसेच नोकरीतील स्थिरता याबद्दल मागोवा घेण्याची तरतूद आहे.

प्रशिक्षणार्थ्यांना ३,६,१२ तसेच २४ महिन्यांच्या कालावधीनंतर संपर्क साधला जाईल. नोकरी व्यतिरिक्त इतर पर्याय निवडणा-या विद्यार्थ्यांना नॅट्स, नैप्स या शासकीय पोर्टलद्वारे शिकाऊ उमेदवारीची संधी उपलब्ध केली जाईल. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक प्रगती तसेच शाश्वत रोजगाराचा मार्ग निश्चित करण्यास मदत होईल.

गेल्या दहा वर्षांत DELL टेक्नॉलॉजीने देशभरातील शालेय नवोप्रकमाला चालना दिली आहे. या काळात कंपनीने डिजिटल साक्षरता, समस्या निराकरण कौशल्य तसेच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. या प्रयत्नांतून पायाभूत तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून बारावीपर्यंतच्या ५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांची यशस्वी जडणघडण करता आली. यासह अटल नवोपक्रम अभियान आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकरिता ‘स्टुडंट एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम २.०’ चेही आयोजन केले जाते. तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा आणि स्थानिक पातळीवर नव संकल्पना आणि उपाययोजना विकसित करणारा हा यशस्वी उपक्रम म्हणून गणला जातो.

‘उडान’ उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे DELL टेक्नॉलॉजीजच्या समुदाय विकास कार्याला पुढील दिशा मिळाली. मुळात, देशातील सशक्त शालेय परिसंस्थेचा आधार घेत हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे. देशातील रोजगाराशी निगडीत बदलत्या गरजा यांचा भविष्यातील आवश्यक मनुष्यबळ या घटकाशी सांगड घालत हा उपक्रम राबवला जात आहे. DELL ‘उडान’ उपक्रमासह ‘सोलर कम्युनिटी हब’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणीही सुरु ठेवणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना डिजिटल कौशल्यांपर्यंत विकसित केले जाते.

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

कंपनी आर्थिक आणि मर्यादित संसाधनांमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या विविध भारतीय समुदायांना घडवत आहे. याकरिता या समुदायांपर्यंत AI वर आधारित शिक्षण साहित्य, कौशल्यविकास प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधीही पोहोचवण्याकरिता कंपनी प्रयत्नशील आहे. आर्थिक वर्ष २०१३ पासून सोलर कम्युनिटी हब्सच्या माध्यमातून देशातील १८ जिल्हे तसेच १४ राज्यातील २६.७ लाख लाभार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण तसेच रोजगारासंबंधीत धडे देण्यात आले आहेत. यंदा जून २०२६ मध्ये DELL ने या पद्धतीने ५ नवे हब्स सुरु केलेत. परिणामी,५० अतिरिक्त संस्थांमध्ये हा कार्यक्रमाचा विस्तार झाला. ५ नव्या हब्सच्या उभारणीमुळे जगभरातील या हब्सची संख्या थेट ६३ वर पोहोचली आहे.

DELL टेक्नॉलॉजीज कंपनीविषयी

DELL टेक्नॉलॉजी ही कंपनी विविध संस्था तसेच व्यक्तींना त्यांचे डिजिटल भविष्य घडवण्यास मदत करते. कंपनी लोकांचे काम, दैनंदिन आयुष्य तसेच जीवनमान उंचावण्यास हातभार लावते. आजच्या माहितीपर डिजीटल युगात कंपनी आपल्या ग्राहकांना तंत्रज्ञान, उत्पादने तसेच सेवा उद्योगांत व्यापत स्वरूपात अत्याधुनिक पोर्टफोलिओ प्रदान करते.

Web Title: Dell udaan initiative 23000 youth to get ai cloud and electronics skills training in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.